Spread the news

PAT परीक्षेच्या वेळी करावयाची पट पडताळणी पुढे ढकला: महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीची मा .शिक्षण सचिव आणि मा .शिक्षण संचालकांचे कडे मागणी
कोल्हापूर :दि 31 मार्च 2026 ला शिक्षण संचालकांनी आदेश काढून PAT परीक्षेच्या वेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांना शाळांच्या मध्ये जाऊन पट पडताळणी करावया सांगितले आहे .या पट पडताळणीमुळे शाळेत गोंधळाची परिस्थिती निर्माण होणार असल्याने ही पट पडताळणी पुढे ढकलावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य खासगी प्राथमिक शिक्षक सेवक
समितीच्या वतीने राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केली आहे . याबाबतचे निवेदन मा .शालेय शिक्षण सचिव व शिक्षण संचालक मा .शरद गोसावी यांचे केली आहे . राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी दिलेल्या या निवेदनात म्हंटले आहे की,एप्रिल महिन्यात PAT परीक्षेवेळी म्हणजे दि . 11 ,15 व 22 एप्रिल रोजी शाळांच्या मध्ये जाऊन पटपडताळणी करण्याची निर्देश क्षेत्रीय अधिकाऱ्यांना दिलेले आहेत . शाळांनी PAT परीक्षेची तयारी , मूल्यमापनाचे नियोजन केलेले आहे .अशावेळी क्षेत्रीय अधिकाऱ्यांनी शाळांमध्ये भेटी दिल्यास विद्यार्थी व शिक्षकांच्या वर दबाव येऊन शाळांत गोंधळाची परिस्थिती निर्माण होईल . राज्यशासनाने पटपडताळणीचे निर्देश 3 नोव्हेंबर 2025 मध्ये दिलेले असताना आता वर्षा अखेरच्या मूल्यमापनाच्यावेळी शाळांची पटपडताळणी करणे हे शैक्षणिक दृष्दया योग्य नाही व हे शाळांच्या वरती अविश्वास दाखवण्यासारखे होईल .त्यामुळे हे पटपट आणि पुढे ढकलावी व विद्यार्थ्यांना ही पॅट परीक्षा निकोप व भयमुक्त वातावरणांत देण्यासाठी सहकार्य करावे अशी मागणी राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केलेली आहे .

­

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!