शिक्षकांना मिळणार पाच लाखापर्यंत कॅशलेस वैद्यकीय खर्चाचा लाभ
कोल्हापूर दि.१२ : राज्यातील सर्व जिल्हा परिषद व खाजगी १०० टक्के अनुदानित शाळांमधील कर्मचाऱ्यांचा आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेमध्ये समावेश केल्याने कर्मचाऱ्यांना कॅशलेस वैद्यकिय सुविधेचा प्रती कुटुंब प्रतिवर्षी पाच लाख रुपये पर्यंत हा लाभ मिळणार आहे.
शिक्षण विभागाकडून सार्वजनिक आरोग्य विभागास सादर केलेल्या प्रस्तावानुसार या योजनेमध्ये (शुभ्र शिधापत्रिका धारकांसह ) राज्याच्या सर्व अधिवासी नागरिकांना योजनेअंतर्गत अंगीकृत रुग्णालयांमार्फत विस्तारीत महात्मा फुले जन आरोग्य योजना व आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनांतर्गत प्रति कुटुंब प्रति वर्ष रु. ५.०० लक्ष चे आरोग्य संरक्षणाचे लाभ अनुज्ञेय आहेत. या लाभार्थ्यांमध्ये शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचान्यांचा समावेश करण्यात आला आहे.
राज्यातील शिक्षकांना पाच लाख रुपये पर्यंतचा कॅशलेस वैद्यकीय सुविधेचा लाभ मिळणार आहे या निर्णयामुळे शिक्षकांतून समाधान व्यक्त होत आहे.
……….
प्रतिक्रिया
” गेल्या अनेक वर्षे शिक्षकांना कॅशलेस आरोग्य योजना लागू करावी अशी मागणी महासंघाच्यावतीने करण्यात आली होती. या निर्णयामुळे पाच लाखापर्यंतचे कॅशलेश वैद्यकीय उपचार घेता येणार आहे. तरी सर्व शिक्षकांनी आपले आयुष्यमान जन आरोग्य कार्ड तात्काळ काढावे. या योजनेचा लाभ घ्यावा. ”
राजेंद्र कोरे,राज्य सचिव महाराष्ट्र राज्य मान्य खाजगी प्राथमिक शिक्षक व शिक्षकेतर महासंघ







