सावर्डे बुद्रुक विद्यामंदिर शाळेची नवीन इमारत अद्यावत व सर्वांग सुंदर बनेल
मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
सावर्डे बुद्रुकमध्ये विद्यामंदिर शाळा इमारतीचे भूमिपूजन उत्साहात
सावर्डे बुद्रुक, दि. ३:
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेची नवीन इमारत अद्यावत व सर्वांगसुंदर बनेल, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. या शाळेच्या नवीन इमारतीसाठी एक कोटीहून अधिक निधी मंजूर केलेला आहे. तरीसुद्धा अजूनही इमारतीसह परिसर विकासासाठी आवश्यक तो निधी देऊ आणि शाळेला सर्वतोपरी सहकार्य करू, असेही ते म्हणाले.
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथे विद्या मंदिर शाळेच्या इमारतीचे भूमिपूजन मंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. या शाळेसाठी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी एक कोटीहून अधिक निधी दिला आहे.
श्री. मुश्रीफ पुढे म्हणाले, इंग्रजी माध्यमाच्या कॉन्व्हेंट शाळांचे तर पेवच फुटले आहे. आय. सी. एस. सी., सी. बी. एस. सी. अशा इंग्रजी माध्यमाच्या शाळांकडे विद्यार्थ्यांचा विशेषता पालकांचा कल वाढलेला आहे. त्यामुळे अतिरिक्त होणारे शिक्षक समायोजन करण्याचे प्रमाण वाढले. 70- 80 वर्षांपूर्वीची जुनी जीर्ण झालेली इमारत पाडून ही नवीन आर. सी. सी. इमारत मोठ्या दिमाखात उभी राहणार आहे. तीन एकराच्या विस्तीर्ण परिसरात असलेली ही शाळा सर्वांगसुंदर होण्यासाठी अजूनही आवश्यक तो निधी देऊन सर्वतोपरी सहकार्य करीन.
या गावचे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक श्रीकांत जिरगे म्हणाले, एका ऊद्योजक परिषदेच्या निमित्ताने मुंबईत स्वर्गीय रतन टाटा यांच्या उपस्थितीत एका कार्यक्रमासाठी गेलो होतो. यावेळी ते म्हणाले होते, तुम्ही खेड्यापाड्यातून येऊन मुंबईत स्थिरस्थावर झाला आहात. तुम्ही गावी गेले पाहिजे आणि आपल्या मातृभूमीसाठी काहीतरी केले पाहिजे. त्या भावनेतूनच मी ज्या शाळेत शिकलो त्या या विद्यामंदिर शाळेच्या प्रगतीसाठी योगदान देत राहिलो. या सगळ्याचे आत्मिक समाधान फार मोठे आहे.
दानत महत्त्वाची…..!
मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, या गावाचे सुपुत्र व मुंबईस्थित उद्योजक श्रीकांत जिरगे यांनी या शाळेसाठी फार मोठी मदत केली आहे. त्यांच्या आईने अत्यंत खडतर आणि गरिबीतून त्यांना शिक्षण दिले. मोठ्या जिद्दीने तेही व्यवसायात उभे राहिले. पैसा निव्वळ असून चालत नाही, तो चांगल्या कामांसाठी देण्याचीही दानत हवी. ही फार मोठी दानत श्रीकांत जिरगे यांच्याकडे आहे.
यावेळी व्यासपीठावर उद्योजक श्रीकांत जिरगे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, कागल पंचायत समितीच्या सभापती सौ. सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती. शोभाताई फराकटे, उपसभापती डॉ. इंद्रजित पाटील, सरपंच राजश्री चिंदगे, उपसरपंच सागर सावर्डेकर, गटशिक्षणाधिकारी सारिका कासोटे, शिक्षण विस्तार अधिकारी आर. एस. गावडे, माजी पंचायत समिती सदस्या प्रभावती पाटील, दिपक आंगज, प्रताप पाटील, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील, मालुताई चिंदगे, शितल हिरूगडे, शंकर जाधव, विनोदकुमार कांबळे, विलास अस्वले, पांडुरंग काशीद, शिवाजीराव चिंदगे, मुख्याध्यापक चंद्रकांत चौगुले आदीप्रमुख उपस्थित होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णा पाटील, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभाकाकी फराकटे, पंचायत समितीचे उपसभापती डाॅ. इंद्रजीत पाटील, माजी पंचायत समिती सदस्य प्रभावती पाटील गटशिक्षणाधिकारी संसारी कासोटे यांची भाषणे झाली
स्वागत शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष आप्पासाहेब पाटील यांनी केले. प्रास्ताविक मुख्याध्यापक चंद्रकांत चौगुले यांनी केले. सूत्रसंचालन विवेक गवळी यांनी केले.
……….
सावर्डे बुद्रुक ता. कागल येथील विद्यामंदिर शाळेच्या नवीन आठ खोल्यांच्या इमारतीचे भूमिपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. शिल्पा खोत, जिल्हा परिषद सदस्या श्रीमती शोभाकाकी फराकटे, पंचायत समिती सभापती सौ. सुवर्णा पाटील उपसभापती डाॅ. इंद्रजीत पाटील आदी प्रमुख.





