जनतेला आवडणारी आणि जनतेची श्रद्धा असणारी कामे करीत आलो वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांचे प्रतिपादन

Spread the news

जनतेला आवडणारी आणि जनतेची श्रद्धा असणारी कामे करीत आलो

­

 

वैद्यकीय शिक्षण मंत्री हसनमुश्रीफ यांचे प्रतिपादन

  •  

इंचनाच्या पांडवकालीन प्राचीन गणेश मंदिर मंदिरासमोरील बोअरवेलचे मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पाणीपूजन

इंचनाळ, दि. ४:
आज पर्यंतच्या राजकीय आणि सामाजिक वाटचालीत जनतेला आवडणारी आणि जनतेची श्रद्धा असणारी कामे करीत आलो, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ केले. संपूर्ण आयुष्यभर याच पद्धतीने लोकोपयोगी कामे करीत राहू, असेही ते म्हणाले.

इंचनाळ ता. गडहिंग्लज येथील प्राचीन पांडवकालीन श्री. गणेश मंदिराच्या प्रांगणात नामदार हसनसाहेब मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने मारण्यात आलेल्या बोअरवेलचे पाणीपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले.

भाषणात मंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले, येथील पांडवकालीन प्राचीन गणेश मंदिराकडे लाखो भाविक मोठ्या श्रद्धेपोटी येत असतात. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारादरम्यान या बोअरवेल मारून देण्याचे वचन माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील- गिजवणेकर यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीपूर्वीच त्यांनी तो बोअरवेल मारून दिला आणि बोरवेलला दीड इंची पाणीही लागले. या बोअरवेलच्या पाणी साठ्यासाठी टाकी उभा करून ते ग्रामस्थांना देण्यासाठी सतीश पाटील यांनी प्रयत्न करावेत.

ते पुढे म्हणाले, कागल, गडहिंग्लज, उत्तुर विधानसभा मतदारसंघाच्या “मुख्यमंत्री बळीराजा पानंद/ शेत रस्ते योजना समिती” माझ्या अध्यक्षतेखाली आहे. पहिल्या टप्प्यात प्रत्येक गावातील किमान एक पानंद या योजनेअंतर्गत झालीच पाहिजे, यासाठी मी आग्रही आहे. रविवारी दि. १९ अक्षय तृतीयेच्या शुभ मुहूर्तावर या अभियानाची सबंध विधानसभा मतदारसंघात सुरुवात होणार आहे. तसेच; केडीसीसी बँकेच्या अर्थसहाय्यातून अल्प व्याजदरात सबंध जिल्हाभर “पी. एम. सूर्यघर मोफत वीज” हे अभियानही प्रभावीपणे राबविणार आहोत. महाराष्ट्र दिनाच्या शुभ मुहूर्तावर एक मेपासून या अभियानाची सुरुवात होणार आहे. केडीसीसी बँकेच्यावतीने लाडक्या बहिणींसाठी अर्थसहाय्य योजनेमध्ये ३० हजारांवरून ५० हजार रूपये अशी वाढ केलेली आहे.

पंढरपुरातही आश्रम बांधू……!
श्री. मुश्रीफ म्हणाले, विकासकामांबरोबरच गोरगरिब आणि सर्वसामान्य माणसाची सेवा करणे हा अजेंडा घेऊन आपण वाटचाल करीत आहोत. उभी हयात लोकांना आवडणारी आणि लोकांची श्रद्धा असणारी कामे करीत आलो आहोत. येथील वारकरी संप्रदायाने पंढरपुरात आश्रमासाठी जागा घेतलेली आहे. तिथे सुंदर असा आश्रम बांधून देऊ. त्यामुळे आषाढी वारीसह वर्षभरात पंढरपूरला दर्शनासाठी जाणाऱ्या वारकरी आणि ग्रामस्थांची चांगली सोय होईल.

यावेळी माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सतीश पाटील – गिजवणेकर, गोड साखरचे चेअरमन प्रकाशभाई पताडे, जिल्हा परिषद सदस्या शैलजा पाटील, पंचायत समिती सदस्या सुनिता देसाई, गोड साखरचे संचालक विश्वनाथ स्वामी, सरपंच उत्तम कांबळे, सयाजीराव देसाई, विशाल देसाई, शिवाजी राणे, आनंदराव पोवार, महादेव जाधव, शहाजी होडगे, बबन पाटील, सचिन पाटील, युवराज देसाई, विकास पाटील, उदय देसाई, शंकर स्वामी, प्रदीप लोहार, परशराम कुंभार, यांच्यासह वारकरी सांप्रदायातील सर्व प्रमुख व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
……….

इंचनाळ ता. गडहिंग्लज येथील पांडवकालीन प्राचीन गणेश मंदिरासमोर मारलेल्या बोअरवेलचे पाणीपूजन वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सतीश पाटील-गिजवणेकर व इतर प्रमुख मान्यवर.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!