कामाचा डोंगर रचणाऱ्या संग्राम पाटील यांचा विजय निश्चित : खासदार शाहू महाराज
गुंडगिरीला थारा देऊ नका आमदार सतेज पाटील यांचे आवाहन
काम केले म्हणून तर आमच्या घरात पुन्हा सरपंच
‘पाचगाव :
लोकनियुक्त सरपंच म्हणून केलेल्या कार्याच्या जोरावर संग्राम पाटील यांनी पाचगाव परिसराचा कायापालट करून तरुणांच्या गळ्यातील आयडॉल बनलेल्या संग्राम पाटील यांचा विजय निश्चित आहे, असे प्रतिपादन खा. शाहू महाराज यांनी केले. खा. शाहू महाराज म्हणाले, पाचगाव जि. प. मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार संग्राम पाटील हे नाव आज केवळ राजकीय व्यासपीठापुरते मर्यादित राहिले नाही. विश्वास आणि कार्यक्षम विश्वासू असल्यामुळेच अवघ्या २४ व्या वर्षी लोकनियुक्त सरपंचपदाची धुरा पाचगावकरांनी दिली आहे. ही जबाबदारी समर्थपणे सांभाळणाऱ्या संग्राम पाटील यांनी अल्पावधीतच आपल्या कामाचा ठसा उमठवला आहे. त्याच कामाच्या जोरावर संग्राम पाटील यांचा जि.प. निवडणुकीत विजय निश्चित आहे.
आ. सतेज पाटील म्हणाले की, लोकनियुक्त सरपंचाचा मान मिळालेला संग्राम यांच्या निष्कलंक, संयमी, राजकारण विरहित विकासामुळे दुसऱ्यांदा लोकनियुक्त सरपंचपदाचा मान त्यांच्या सौभाग्यवतींना मिळालेला आहे. स्पष्ट दृष्टिकोन, नियोजनबद्ध काम आणि लोकांशी थेट संवाद साधणारा संग्राम असल्याने तीच विजयाची परंपरा जि. प. निवडणुकीमध्ये होणार आहे.
संग्राम पाटील म्हणाले की, सरपंचपदाच्या काळात पाणीटंचाईचा प्रश्न, खड्डेमुक्त रस्ते, गटार बांधणी, ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क, आरोग्य केंद्राची उभारणी, महिला सक्षमीकरण, संरक्षण आणि रोजगार निर्मितीचा ठोस आराखडा डोळ्यांसमोर ठेवून अनेक बचत गटांच्या माध्यमातून स्वयंपूर्ण उद्योग व्यवसाय सुरू करून दिले आहेत. तरुणाच्या भविष्यासाठी
अद्ययावत स्पर्धा परीक्षा केंद्र, ग्रंथालयाची स्थापना, जि.प. शाळांचे नूतनीकरणाबरोबरच डिजिटेलायझेशन करून सर्वसामान्य मुलांना शिक्षण, तसेच स्वखर्चातून ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र, रस्ते व बंदिस्त गटर्स, भव्य क्रीडांगण, स्वच्छ व सुंदर परिसर ठेवण्यासाठी विशेष उपक्रम, बांधकाम कामगारांना विविध योजनांचा लाभ, तसेच महिलांसाठी रोजगारनिर्मिती करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.
विकासकाम करताना न ठेवता, अडचणींमध्ये पक्षपातीपणा सर्वसामान्यांच्या खंबीरपणे उभे राहणारे नेतृत्व म्हणून संग्राम पाटील यांची ओळख आहे. नागरिकांना मूलभूत सुविधा, सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी खंबीर लढा, प्रशासकीय अनुभव आणि विकासाची स्पष्ट दिशा असलेले नेतृत्व म्हणून संग्राम पाटील हे पाचगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील जनतेची पहिली पसंती ठरत असून, वरिष्ठ नेत्यांच्या कौतुकासह जनतेच्या विश्वासावर त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे. यावेळी ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.



