उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात १०१ लोकांच्या उपस्थितीत महाअभिषेक; विराज पाटील
कोल्हापूर :
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी मंदिरात एकशेएक लोकांच्या उपस्थितीत महाअभिषेकाचे आयोजन करण्यात आले. महालक्ष्मी देवीच्या चरणी ठाकरे यांना उदंड आयुष्य लाभो, यासाठी विशेष अभिषेक करण्यात आला.
या कार्यक्रमाचे आयोजन शिवसेना करवीर तालुका प्रमुख विराज पाटील यांच्या पुढाकाराने करण्यात आले होते. सामाजिक बांधिलकी जोपासत वेळोवेळी समाज उपयोगी उपक्रम राबवणारे विराज पाटील यांनी या दिवशी श्रद्धा व निष्ठेने हा धार्मिक उपक्रम आयोजित केला.
कार्यक्रमाला उपजिल्हाप्रमुख अवधूत साळोखे, उपतालुकाप्रमुख अरुण अब्दागिरी, करण भिलुगडे, धैर्यशील पाटील आदी शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.