‘मॅक’च्या अध्यक्षपदी मोहन कुशिरे व उपाध्यक्षपदी विठ्ठल पाटील यांची एकमताने फेरनिवड
*कागल – दि. १६ ऑक्टोबर २०२५* : कागल-हातकणंगले पंचतारांकित औद्योगिक क्षेत्रातील उद्योजकांच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडविण्यासाठी सातत्याने कार्यरत असलेल्या मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन ऑफ कागल-हातकणंगले [मॅक] या संस्थेच्या संचालक मंडळाची १२ वी सभा आज कै. रामप्रताप झवर सभागृहात, अध्यक्ष श्री. मोहन कुशिरे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली.
या बैठकीत सन २०२५ – २०२६ या वर्षाकरिता नूतन पदाधिकाऱ्यांची एकमताने फेरनिवड करण्यात आली.
🏛 *मॅकचे नूतन पदाधिकारी* :
• अध्यक्ष : मोहन रघुनाथ कुशिरे
• उपाध्यक्ष : विठ्ठल ईश्वरा पाटील
• मानद सचिव : सुरेश महादेव क्षीरसागर
• मानद खजिनदार : अमृतराव तुकाराम यादव
फेरनिवडीबद्दल सर्व संचालकांनी दाखवलेल्या विश्वासाबद्दल आभार मानताना अध्यक्ष मोहन कुशिरे यांनी सांगितले की, “संस्थेच्या माध्यमातून उद्योजक व कामगार बांधवांच्या हितासाठी विविध उपक्रम राबविण्याचा माझा मानस आहे. संस्थेची भव्य वास्तू उभारणे आणि कौशल्य विकास केंद्राच्या माध्यमातून कुशल मनुष्यबळ तयार करणे हे आमचे प्रमुख ध्येय असून, मूलभूत सोई-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील राहू”. “गेल्या वर्षभरात संचालक मंडळ, माजी अध्यक्ष, सभासद आणि हितचिंतक यांच्या सहकार्यामुळे मॅकने औद्योगिक क्षेत्रात आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. हीच गती पुढे कायम ठेवून अधिक गुणवत्तापूर्ण काम करणार आहोत.”
तसेच उपाध्यक्ष विठ्ठल पाटील, मानद सचिव सुरेश क्षीरसागर आणि मानद खजिनदार अमृतराव यादव यांनीदेखील आपल्या फेरनिवडीबद्दल सर्व संचालकांचे आभार मानले व संस्थेच्या माध्यमातून उद्योग व कामगारवर्गाच्या हितासाठी कार्य करण्याची ग्वाही दिली.
या निवडीप्रसंगी मॅकचे संचालक अशोक दुधाणे, संजय जोशी, संजय पेंडसे, हरिश्चंद्र धोत्रे, यशवंत पाटील, मुबारक शेख, अनिल जाधव, भावेश पटेल, कुमार पाटील तसेच सचिव शंतनू गायकवाड आदी मान्यवर उपस्थित होते.
बैठकीचा समारोप नूतन पदाधिकाऱ्यांचे मन:पूर्वक अभिनंदन आणि त्यांच्या पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देऊन करण्यात आला.