केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी वर्ग*

Spread the news

*खासदार धनंजय महाडिक यांनी घेतली केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची भेट, केंद्र शासनाच्या खेलो इंडिया योजनेतून कोल्हापुरातील हॉकी स्टेडियमसाठी १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी वर्ग*

खासदार धनंजय महाडिक यांनी नवी दिल्लीत केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री श्रीमती रक्षा खडसे यांची भेट घेतली. कोल्हापुरातील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमला केंद्र शासनाकडून खेलो इंडिया योजनेतून, अ‍ॅस्ट्रो टर्फ बसवण्यासाठी आणि अन्य सुविधांसाठी निधी मंजूर झाला आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या देखरेखीखाली हॉकी स्टेडीयममध्ये अ‍ॅस्ट्रो टर्फ तयार झाले. मात्र मंजूर झालेल्या निधीतील शेवटच्या टप्प्यातील १ कोटी ३७ लाख रुपयांचा निधी मिळाला नव्हता. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी केंद्रीय राज्यमंत्री खडसे यांचे लक्ष वेधले. त्यानंतर तत्काळ शेवटच्या टप्प्यातील निधी कोल्हापूर महानगरपालिकेकडे वर्ग झाला. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी नामदार रक्षा खडसे यांचे आभार मानले आहेत.
राज्यसभेेचे खासदार धनंजय महाडिक यांनी नुकतीच नवी दिल्लीत केंद्रीय युवा आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांची भेट घेतली. खेलो इंडिया या योजनेतून कोल्हापूर महापालिकेच्या अखत्यारितीत मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमच्या विकासासाठी भरघोस निधी मंजूर झाला आहे. शासनाच्या निधीतूनच या हॉकी स्टेडियमवर अ‍ॅस्ट्रो टर्फ आणि अन्य सुविधा बनवण्यात आल्या आहेत. त्यामुळे ध्यानचंद हॉकी स्टेडियम कोल्हापुरातील हॉकी खेळाडूंसाठी एक परिपूर्ण मैदान बनले आहे. मात्र केंद्र सरकारने मंजूर केलेल्या निधीतील शेवटच्या टप्प्यातील १ कोटी ३७ लाख रुपये वर्ग झाले नव्हते. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे यांना माहिती देवून, निधी तातडीने देण्याची विनंती केली. त्याबद्दलचे पत्र खासदार महाडिक यांनी दिले. त्यानंतर तत्काळ शेवटच्या हप्त्याची रक्कम शासन स्तरावर मंजूर झाली आणि १ कोटी ३७ लाख रुपये कोल्हापूर महापालिकेच्या खात्यावर वर्ग झाले. त्याबद्दल खासदार महाडिक यांनी केंद्रीय राज्यमंत्री नामदार खडसे यांंचे आभार मानले आहेत.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!