वारणा दूध संघाकडून दूध उत्पादक व कामगारांना दिवाळीसाठी ९१ कोटी रूपये -आम. डॉ.विनय कोरे म्हैस दूधास प्रतिलिटर २ रुपये ५५ पैसे तर गाय दूधास १ रुपये ५५ पैसे विक्रमी फरकबील जाहीर

Spread the news

वारणा दूध संघाकडून दूध उत्पादक व कामगारांना दिवाळीसाठी ९१ कोटी रूपये -आम. डॉ.विनय कोरे

 

 

  •  
  1. म्हैस दूधास प्रतिलिटर २ रुपये ५५ पैसे तर गाय दूधास १ रुपये ५५ पैसे विक्रमी फरकबील जाहीर8

वारणानगर (ता . पन्हाळा)येथील वारणा सहकारी दूध संघ दूध उत्पादक शेतकऱ्यांना फरक बिल आणि कामगारांना पगार व बोनस अशी तब्बल ९१ कोटी रुपयांची रक्कम दिपावलीनिमित्ताने देणार असल्याची घोषणा वारणा सहकारी दूध संघाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना केली.
दूध उत्पादकांना प्रतिलिटर म्हैस दूधासाठी २ रूपये ५५ पैसे व गाय दुधासाठी १ रूपये ५५ पैसे इतका विक्रमी फरक बील देण्यात येणार असून विशेष बाब म्हणजे म्हैस व गाय दुधासाठी विक्रमी फरकबील देणारा वारणा दूध संघ हा महाराष्ट्रातील एकमेव असल्याचा उल्लेख अध्यक्ष डॉ.कोरे यांनी केला.
फरक बिल व बोनसची रक्कम गुरुवार दि.९ ऑक्टोंबर रोजी दूध संस्था तसेच कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग केली जाणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगून अध्यक्ष आम.विनय कोरे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून शेतकरी व कर्मचारी वर्गाला दिवाळीसाठी ही गोड भेट असल्याचे नमूद केले.तर संघाचे उपाध्यक्ष एच.आर.जाधव यांनी
संघाने घेतलेल्या या निर्णयामुळे शेतकऱ्यांची व कर्मचाऱ्यांची दिवाळी आनंददायी होणार आहे असल्याचे सांगितले.
वारणा दूध संघाने शेतकऱ्यांसाठी अमृत पशुधन सुरक्षा कवच योजना सुरू करून या योजनेद्वारे आतापर्यंत सुमारे २ कोटी ४३ लाख रुपयांचा लाभही उत्पादकांना दिला आहे संघाने नेहमी जास्तीत जास्त परतावा आणि पशुवैद्यकीय सेवा माफक दरात देवून विस्तार सेवेअंतर्गत विविध अनुदानपर योजना राबविल्या आहेत. तर म्हैस दूध उत्पादकांसाठी ५०० रुपयात १ लाख रुपयांचे विमा संरक्षण देवून शेतकरी वर्गाला दिलासा दिला आहे

दसऱ्यादिवशी संघाचा ब्रॅन्ड असणांऱ्या वारणा श्रीखंडामध्ये व्हेनिला व स्ट्रॉबेरी या स्वादामध्ये नवे श्रीखंड विक्रीसाठी बाजारात आणले आहे
याबरोबरीने वारणा दूध संघ संलग्न असणाऱ्या तात्यासाहेब कोरे दूध साखर वाहतूक संस्था,सावित्री महिला औद्योगिक संस्था,अमृत सेवक पतसंस्था व डॉ.आर.ए.पाटील पतसंस्था,वारणा डेरी अॅन्ड अॅग्रो इंडस्ट्रीज या सर्व संस्थाच्या कर्मचाऱ्यांनाही बोनस देण्यात येणार असल्याचे संघाचे कार्यकारी संचालक सुधीर कामेरीकर यांनी सांगितले.
याप्रसंगी संघाचे उपाध्यक्ष एच.आर. जाधव,सर्व संचालक ,अकौंटस
मँनेजर प्रवीण शेलार,संकलन व्यवस्थापक डॉ.अशोक पाटील, मार्केटिंग मॅनेजर अनिल हेर्ले,फॅक्टरी मॅनेजर श्रीधर बुधाले, पशूवैद्यकीय व्यवस्थापक डॉ.जे.बी.पाटील आदी उपस्थित होते.
….


Spread the news

You may also like

error: Content is protected !!