विजयकुमार आबासाहेब भोसले यांची इंडीयन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसीएशनच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी

Spread the news

विजयकुमार आबासाहेब भोसले यांची इंडीयन बुलियन अॅण्ड ज्वेलर्स असोसीएशनच्या पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्षपदी निवड झाली आहे

 

 

  •  

श्री. विजयकुमार भोसले सरदार हे गेली 44 वर्षे सराफी व्यवसाय करीत आहेत. सध्या ते कोल्हापूर सराफ व्यापारी संघ कोल्हापूर व कोल्हापूर जिल्हा सराफ संघ या दोन संस्थेत संचालक म्हणून कार्यरत आहेत.

IBJA विषयी IBJA 106 वर्षे जुणी संस्था आहे. भारतामधील सोन्याचांदीचे भाव ठरविण्यामध्ये IBJA चा प्रमुख सहभाग असतो. 29 राज्यात कार्यरत असणारी संस्था आहे.

तसेच रिझर्व्ह बँक ऑफ इंडीया IBJA कडून सोन्याचे रेट घेऊन त्या प्रमाणे गोल्ड बॉण्ड चे रेट ठरवले जातात.

भारतामध्ये किमती धातुची जी पॉलीसी ठरवली जाते त्या मध्ये IBJA चा प्रमुख सहभाग असतो तसेच भारतामध्ये सर्वात मोठी इंडिया इंटरनॅशनल बुलियन समिटचे आयोजन IBJA दर वर्षी करत असते या मध्ये सर्व देशांचे डेलिगेटस् सहभाग नोंदवतात.

तसेच भारतामध्ये सर्वात मोठे चांदीचे प्रदर्शन मुंबई दिल्ली, आग्रा व बेगंलुरु येथे आयोजीत केले जाते. अशा ज्वेलरी व्यावसायातील सर्वात जुन्या व मोठया संस्थेच्या पश्चिम महाराष्ट्राच्या उपाध्यक्ष पदी विजयकुमार भोसले सरदार निवड झाली आहे.

IBJA नॅशनल सेक्रेटरी श्री. सुरेंद्रजी मेहता, महाराष्ट्र स्टेट प्रसिडेन्ट श्री. हरिषजी केवल रामानी, महाराष्ट्र स्टेट व्हाईस प्रेसिडेन्ट श्री. विजय लक्षरेजी, रिजनल प्रेसिडेन्ट – पश्चिम महाराष्ट्र श्री. किरण आळंदिकरजी.
या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!