युपीएससी परीक्षा पास होऊन हेमराज पनोरेकरने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले- व्ही.बी.पाटील

Spread the news

 

युपीएससी परीक्षा पास होऊन हेमराज पनोरेकरने आई-वडिलांच्या कष्टाचे चीज केले- व्ही.बी.पाटील

यूपीएससी 2024 मध्ये घेण्यात आलेल्या परीक्षे मध्ये कोल्हापूरचा झेंडा सहा विद्यार्थ्यांनी फडकवला. यापैकी पन्हाळा तालुक्यातील दुर्गम भागातील पनोरे या गावातील यशस्वी विद्यार्थी श्री हेमराज हिंदुराव पनोरेकर सध्या राहणार फुलेवाडी यांचा कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील व शहराध्यक्ष आर. के. पोवार यांच्या शुभहस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी हेमराज याने आपल्या यशाचे गमक सांगत असताना मी कोणताही क्लास न लावता घरात अभ्यास केला असे आवर्जून सांगितले. यावेळी व्ही. बी. पाटील यांनी आज तुझ्या आई-वडिलांच्या कष्टाचे चीज झाल्याचे सांगितले. वडील शाहू हायस्कूल मध्ये सीनियर क्लार्क म्हणून सेवा बजावत आहे अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये तुला त्यांनी दिलेली साथ फार महत्त्वाची आहे. तुझ्या यशामध्ये आई-वडिलांचा सिंहाचा वाटा असल्याचे व्ही. बी. पाटील यांनी सांगितले. यावेळी आर. के. पोवार यांनी आमच्या कोल्हापूरचे नाव तुम्ही मोठे केले त्याबद्दल आम्हा शहरवासीयांना अभिमान असल्याबाबतचे सांगितले. यावेळी कार्याध्यक्ष अनिल घाटगे यांनी सर्वांचे आभार मानले. यावेळी महिला शहराध्यक्ष पद्मजा तिवले, सेक्रेटरी सुनील देसाई, उपाध्यक्ष दिनकर कांबळे व हेमराजचे आई वडील उपस्थित होते.

 

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!