‘शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बाल गटात१५१बालमल्लांचा सहभाग सलग ४०व्या वर्षी ऑलिंपिकच्या धर्तीवर नेटके नियोजन

Spread the news

‘शाहू’च्या मॅटवरील कुस्ती स्पर्धेत पहिल्या दिवशी बाल गटात१५१बालमल्लांचा सहभाग*
*सलग ४०व्या वर्षी ऑलिंपिकच्या धर्तीवर नेटके नियोजन*

­

 

कागल, ता.२४: येथील श्री. छत्रपती शाहू सहकारी साखर कारखान्यामार्फत शाहू जयंतीनिमित्त आयोजित मॅटवरील कुस्ती स्पर्धेला आज उत्साहात प्रारंभ झाला. स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी बाल गटात तब्बल १५१ मल्लांनी सहभाग नोंदवत चटकदार कुस्त्या केल्या.
कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंहजी घाटगे यांच्या संकल्पनेतून गेल्या चार दशकांपासून या कुस्ती स्पर्धेचे संपूर्णपणे ऑलिंपिकच्या धर्तीवर नेटके आयोजन केले जाते.स्पर्धेचे उद्घाटन शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या हस्ते झाले. यावेळी दोन प्रदर्शनीय कुस्त्या झाल्या.जागतिक कुमार कुस्ती स्पर्धेतील सुवर्णपदक विजेत्या सौरभ पाटीलने पाचगावच्या संकेत पाटील याच्यावर बाराविरुद्ध दोन गुणांनी विजय मिळविला. तर शाहू साखर कारखान्याचा मानधनधारक अजित कुद्रेमानकर यांने बानगेच्या पारस माने याच्यावर शून्य गुणांनी विजय मिळविला.
यावेळी शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे, ज्येष्ठ संचालक व कर्नाटकचे माजी ऊर्जा राज्यमंत्री वीरकुमार पाटील,संचालक, कार्यकारी संचालक जितेंद्र चव्हाण यांच्यासह कुस्तीशौकीन मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्यासह शक्तीचे दैवत हनुमान, कारखान्याचे संस्थापक स्व. राजे विक्रमसिंह घाटगे व क्रीडामहर्षी मेघनाथ नागेशकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून घाटगे यांनी मॅट पूजन केले. खेळाडूंनी मानवंदना देत क्रीडा शपथ घेतली.सकाळी शाहू उद्यानातून खेळाडूंनी क्रीडाज्योत कार्यस्थळापर्यंत आणली.

  •  

स्पर्धेसाठी संभाजी वरुटे, बटू जाधव, संभाजी पाटील, बाळासो मेटकर, नामदेव बल्लाळ,रवींद्र पाटील,प्रकाश खोत, के. बी. चौगुले, बापू लोखंडे, सुरेश लंबे, प्रशांत जमनिक, कृष्णात पाटील,गजानन खराडे, अशोक फराकटे,रामदास लोहार,संभाजी मगदूम, तानाजी कुराडे, सिकंदर कांबळे, दत्तात्रय एकशिंगे आदी पंच काम पाहत आहेत. राजाराम चौगुले व कृष्णा चौगुले यांनी निवेदन केले.
दरम्यान, मंगळवारी (ता. २५) स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशी कुमार व ज्युनिअर गटातील स्पर्धकांची नोंदणी सकाळी ८.३० ते ११ वाजेपर्यंत होणार आहे. स्पर्धांना दुपारी एक वाजता सुरुवात होईल. प्रथम व द्वितीय क्रमांकाच्या अंतिम लढती वगळता अन्य सर्व लढती सायंकाळपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहेत.
चौकट
ऑलिंपिकच्या धर्तीवर नेटके नियोजन

चार दिवस चालणाऱ्या या स्पर्धेचे संपूर्ण नियोजन ऑलिंपिकच्या धर्तीवर करण्यात आले आहे. दोन मॅटवर एकाच वेळी सामने सुरू असून दोन्ही ठिकाणी संगणकीय गुणफलक, कोच व आक्षेप नोंदविण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. कुस्तीशौकीनांना घरबसल्या स्पर्धेचा थरार अनुभवता यावा, यासाठी ‘महाखेल-कुस्ती हेच जीवन’ या फेसबुक पेज व यूट्यूब चॅनेलवरून स्पर्धेचे ऑनलाइन प्रक्षेपण केले जात आहे.

 


Spread the news

You may also like

error: Content is protected !!