वारणा विद्यापीठाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत यश*

Spread the news

*वारणा विद्यापीठाच्या मुलींचे बास्केटबॉल स्पर्धेत यश*

*वारणानगर (प्रतिनिधी)* – **श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या वारणा विद्यापीठाने** क्रीडा क्षेत्रात आणखी एक मानाचा तुरा आपल्या शिरपेचात खोवला आहे. येथील *तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी* (TKIET) महाविद्यालयाची विद्यार्थिनी *जानवी खामकर* आणि *यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाची* (YCWM) विद्यार्थिनी *हर्षला पाटील* यांची ७५ व्या *ज्युनियर बास्केटबॉल राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेसाठी* महाराष्ट्र राज्याच्या मुलींच्या १२ जणांच्या संघात निवड झाली आहे. ही प्रतिष्ठित स्पर्धा *२ ते ९ सप्टेंबर २०२५* दरम्यान *लुधियाना (पंजाब)* येथे पार पडणार आहे.

विद्यार्थिनींची ही घोडदौड फक्त त्यांच्या वैयक्तिक मेहनतीचा परिपाक नसून वारणा विभागातील क्रीडा संस्कृतीची देणगी असल्याचे उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. स्पर्धात्मक वातावरणात जिल्हा व राज्यस्तरीय सामने गाजवून या खेळाडूंनी आपली चमक राष्ट्रीय पातळीवर दाखवली आहे.

या यशाबद्दल वारणा विविध उद्योग व शिक्षण समूहाचे अध्यक्ष *डॉ. विनयरावजी कोरे*, वारणा विद्यापीठाचे कुलगुरू *डॉ. डी. टी. शिर्के*, श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी *डॉ. व्ही. व्ही. कारजिनी* यांनी विद्यार्थिनींचे अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. खेळाडूंना प्राचार्य, अधिष्ठाता, प्राध्यापक व कर्मचारी यांचे सहकार्य लाभले. क्रीडा प्रशिक्षक श्री उदय पाटील यांचे विद्यार्थिनींना मार्गदर्शन लाभले.

  •  

या यशामुळे वारणा विद्यापीठासह संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा अभिमान वाढला असून, दोन्ही विद्यार्थिनींवर राष्ट्रीय पातळीवरील उत्तुंग कामगिरीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!