*दीनमित्रकार मुकुंदराव पाटील राज्यस्तरीय* *पत्रकारिता पुरस्कार विश्वास पाटील यांना जाहीर*
नेवास (जि अहिल्यानगर) : नेवासा
तालुक्यातील तरवडी येथील सत्यशोधक दीनमित्रकार
मुकुंदराव पाटील स्मारक समितीचे वतीने देण्यात येणारे २०२५ या वर्षीचे दीनमित्रकार मुकुंदराव पाटील
राज्यस्तरीय पत्रकारीता पुरस्कार कोल्हापूर लोकमतचे जेष्ठ पत्रकार विश्वास शामराव पाटील यांना जाहीर झाला. स्मारक समितीचे अध्यक्ष माजी आमदार पांडुरंग अभंग यांनी ही माहिती दिली.यावेळी उपाध्यक्ष कॉ.बाबा आरगडे व सचिव उत्तमराव पाटील उपस्थित होते. लवकरच त्याचे वितरण होणार आहे..रोख रक्कम, मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप आहे..प्रस्ताव न मागवता कार्य पाहून हे पुरस्कार दिले जातात..
नेवासा तालुक्यातील तरवडी येथील दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्या वतीने सत्यशोधक विचारांशी बांधिलकी असणाऱ्या पत्रकारास व साहित्यिकास दीनमित्रकार मुकुंदराव पाटील स्मारक समितीच्यावतीने १९९५ पासून दरवर्षी पुरस्कार दिले जातात.
विश्वास पाटील गेली तीस वर्षे पत्रकारितेत आहेत. गोरगरीब कष्टकरी, शेती सामान्य माणसांचे प्रश्न ते निष्ठेने मांडत आले आहेत. सनसनाटीपणापेक्षा समाज बदलाच्या पत्रकारितेवर त्यांचा भर राहिला आहे. नुसते प्रश्न मांडण्यापेक्षा त्यावरील उपाय सुचवणारी पत्रकारिता त्यांनी केली आहे. विविध विषयावरील चार पुस्तके त्यांची प्रकाशित झाली आहेत.
*अन्य साहित्य पुरस्कार-२०२५ असे*
रवींद्र रेखा गुरव,कोल्हापूर (कादंबरी-बे दुणे शून्य), माधव जाधव,नांदेड (कथा-आमचं मत आम्हालाच),धनाजी धोंडीराम घोरपडे,सांगली (कविता-जामिनावर सुटलेला काळा घोडा),गजानन इंदुशंकर देशमुख,अमरावती (चरित्र-सबकु सलाम बोलो), संजय बोरुडे,अहिल्यानगर(ललित गद्य-लोकधन), प्रभाकर गायकवाड,परभणी (वैचारिक-मराठा विरुद्ध ओबीसी प्रस्थापितांचे राजकारण), राजेंद्र सलालकर,अहिल्यानगर(समीक्षा-तीव्र कोमल समीक्षेचे प्रकरण).
*विशेष पुरस्कार:-*
सचिन वसंत पाटील, सांगली (मायबोली रंग कथांचे).
———–



