प्रभाग १८ मधून सत्यजित जाधव यांच्या प्रचाराचा दिमाखदार शुभारंभ
जनतेच्या उत्स्फूर्त पाठबळामुळे विजयाचा विश्वास दृढ
कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून शिवसेना व महायुतीचे इच्छुक उमेदवार युवा उद्योजक सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या प्रचाराचा शुभारंभ मोठ्या उत्साहात पार पडला. सम्राट नगर येथील झाडावरचा गणपती येथे झालेल्या या प्रचार शुभारंभ कार्यक्रमाला शिवसैनिक, महायुतीचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली.
शिवसेना उपनेत्या व मा. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव म्हणाल्या, “कोल्हापूरने आम्हाला भरभरून साथ आणि प्रेम दिले आहे. कोल्हापूरकरांच्या पाठबळावरच आम्ही सातत्याने शहराच्या सर्वांगीण विकासासाठी पाठपुरावा करत आहोत. सम्राट नगर प्रभागात नगरसेविका म्हणून काम करताना येथील अनेक प्रश्न मार्गी लावले. नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिला आहे. तुम्ही जशी साथ दिवंगत आमदार चंद्रकांत (आण्णा) जाधव यांना दिली, तशीच साथ मला दिली आणि आता तीच साथ सत्यजितला द्या. शहराच्या आणि प्रभागाच्या विकासाचे स्वप्न साकार करण्यासाठी सत्यजित जाधव यांना महानगरपालिकेच्या सभागृहात पाठवा.”
चेंबर ऑफ कॉमर्सचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, “दिवंगत आमदार चंद्रकांत (आण्णा) जाधव यांच्या पश्चात सत्यजित जाधव यांनी अनेक जबाबदाऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आहेत. उद्योग, व्यवसाय, समाजकार्य आणि क्रीडा क्षेत्रात त्यांनी आपला ठसा उमटवला आहे. त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्वजण आज खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभे राहूया. आज प्रचार शुभारंभाच्या निमित्ताने येथे जमलेली गर्दीच सत्यजित जाधव यांच्या विजयाची खात्री देणारी आहे.”
उमेदवार सत्यजित चंद्रकांत जाधव यांनी आपल्या भाषणात भावनिक शब्दांत सांगितले की, “कोल्हापूरकरांच्या प्रेमामुळे माझे आई आणि वडील दोघेही आमदार झाले. त्यांनी कोल्हापूर शहराच्या सर्वांगीण विकासाला दिशा देण्याचे काम केले. त्याच व्हिजनला पुढे नेत, जनतेच्या आग्रहास्तव मी निवडणुकीच्या रिंगणात उतरत आहे. केंद्रात आणि राज्यात महायुतीचे सरकार असून महापालिकेतही महायुतीची सत्ता येणार हे निश्चित आहे. या माध्यमातून शहराच्या आणि प्रभागाच्या विकासाचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपली साथ आवश्यक आहे,”
यावेळी अंकुश निपाणीकर, शेखर मंडलिक, नितीन शेळके यांची भाषणे झाली. माजी नगरसेवक संभाजी जाधव, राजू हुंबे, उद्योजक राजू पाटील, आनंद पेंडसे, शिवाजीराव पोवार, राजन सातपुते, संगीता नलवडे, देवेंद्र दिवाण, इस्माईल बागवान, शंकराव माने, नजीर पठाण, सुनील देशपांडे (टिंकू), पूजा आडदांडे, तानाजी गुडाळे, मारुती पोवार, विशाल वठारे, माधुरी वठारे, क्षितिज जाधव, सुनील आडदांडे, वैभव साळुंखे, अमोल गुजर, पोपटराव दुर्गे साहेब, चंद्रकांत सावंत, रमेश अष्टेकर, मूलचंद लड्डा, अशोक गवळी, श्रीअंश अथणे, संपत जाधव, दुर्गेश लिंग्रस, बाळासाहेब निचिते, सर्जेराव पायमल, स्वरूपा खुरंदळे, यशवंत पाटील, राधिका सावंत, वैष्णवी रेडेकर, शामल मोहिते, अनिता जाधव यांच्यासह शिवसेना व युवा सेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या प्रचार शुभारंभ कार्यक्रमामुळे प्रभाग क्रमांक १८ मध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, सत्यजित जाधव यांच्या विजयाबाबत कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड आत्मविश्वास दिसून येत आहे.



