राष्ट्रवादी शरद पवार पक्षाची *तिसऱ्या आघाडी बरोबर चर्चा समाधानकारक*
कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक 2026 महाविकास आघाडीचा तिढा अजूनही सुटण्याच्या मार्गावर नाही त्यामुळे आम आदमी पार्टी व वंचित बहुजन आघाडी यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाची बैठक संपन्न झाली.
राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष व्ही. बी. पाटील यांच्या अयोध्या टॉवर या ठिकाणी बैठक संपन्न झाली. बैठकीला वंचित महानगराध्यक्ष श्री अरुण सोनवणे व आपचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष संदीप देसाई यांच्याबरोबर 81 जागेबाबत सविस्तर चर्चा झाली असून इतर काही घटक पक्ष देखील आघाडीमध्ये येण्याची शक्यता आहे. त्यांचं सुद्धा काही जागेवर स्वागत केलं जाईल असे शेवटी व्ही बी पाटील यांनी सांगितले.
वंचित बहुजन आघाडी व आम आदमी पार्टी पक्षाबरोबर अतिशय सविस्तर चर्चा झाली असून इंडिया आघाडीतील इतर घटक पक्ष सुद्धा छोटे-मोठे आमच्याबरोबर येण्यास इच्छुक आहेत. त्यांनाही सोबत घेतलं जाईल असे बैठकी ठरले. बैठकीला राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर के पोवार व प्रदेश निरीक्षक व राष्ट्रीय सचिव बाजीराव खाडे कार्याध्यक्ष अनिल घाटगे हजर होते.
उद्या सविस्तर अधिकची चर्चा होऊन आघाडीवर शिक्का मुहूर्त होईल असे सर्वांना मध्ये ठरवण्यात आले.



