अजितदादा पवार यांच्या अस्थींचे कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात दर्शन* *लाडक्या नेत्याच्या अस्थीदर्शनाने अनेकजण भावूक* *साश्रूनयनांनी घेतले मनोभावे अस्थीकलशाचे दर्शन*

Spread the news

*अजितदादा पवार यांच्या अस्थींचे कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात दर्शन*

­

 

*लाडक्या नेत्याच्या अस्थीदर्शनाने अनेकजण भावूक*

  •  

*साश्रूनयनांनी घेतले मनोभावे अस्थीकलशाचे दर्शन

कोल्हापूर, दि. २:
महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय कै. अजित दादा पवार यांच्या अस्थींची आज कोल्हापुरात भावपूर्ण वातावरणात दर्शन घेतले अस्थिकलशाच्या दर्शनासाठी सकाळी नऊ पासूनच मार्केट यार्ड यातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयासमोरील मंडपात सर्वपक्षीयांनी उपस्थिती लावली आपल्या लाडक्या नेत्याच्या अस्थिचे दर्शन घेताना अनेक जण भाऊ झाले काही ना तर अश्रूंच्या बांध आवरता उनके सावरत सावरत अनेक आणि सासरू नयनांनी या लोकनेतेच्या अस्थींचे दर्शन घेतले.

महाराष्ट्र राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस लतीफ तांबोळी नऊ वाजता अस्थीकलश घेवून कोल्हापुरात आले. मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थीकलश स्वीकारून कै. अजितदादांच्या प्रतिमेसमोर ठेवत फुले वाहून प्रतिमेचे पूजन केले.

*अजितदादांच्या ए. आय. आवाजाने उपस्थितताना अश्रू अनावर….!
लोकप्रतिनिधी, पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे दर्शन घेऊन प्रतिमेला मनोभावे नमस्कार करीत होते. मध्ये- मध्येच कै. अजितदादांचे ए. आय. निर्मित भाषण लावले जात होते. “इतक्या लवकर मी काय जात नसतो तुम्हाला सोडून. मला बी अजित पवार म्हणतात……”, हे शब्द कानावर पडताच अनेकांच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. अनेकजण दाटलेल्या हुंदक्यांना वाट मोकळी करून देत रडत रडतच तर अनेकजण डबडबल्या साश्रुनयनांनी अस्थिकलशाचे दर्शन घेत होते.

आज दिवसभरात मंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार अमल महाडिक, माजी आमदार के. पी. पाटील, माजी आमदार राजेश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, मानसिंगरावदादा गायकवाड, डॉ. नंदाताई बाभुळकर, गोकुळ दूध संघाचे माजी अध्यक्ष रणजीतसिंह पाटील, माजी महापौर आर. के. पोवार, माजी उपमहापौर परीक्षित पन्हाळकर, माजी उपमहापौर महेश सावंत, माजी उपमहापौर सुनील पाटील, केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैया माने, कागलचे माजी नगराध्यक्ष प्रकाशराव गाडेकर, मुरगुडचे माजी नगराध्यक्ष राजेखान जमादार, डॉ. जयंत प्रदीप पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील- आसुर्लेकर, शहराध्यक्ष आदिल फरास, कार्याध्यक्ष अनिलराव साळोखे, केडीसीसी बँकेचे माजी संचालक असिफ फरास, दत्ता पाटील- केनवडेकर, कागलच्या नगराध्यक्षा सौ. सविता प्रताप उर्फ भय्या माने, नगरसेविका सौ. माधवी गवंडी, प्रकाश गवंडी, माजी नगरसेवक सतीश लोळगे, नगरसेविका ॲड. मानसी लोळगे, नगरसेवक नियाज खान, नंदकुमार गुरगर, परिवहनचे माजी सभापती प्रकाश कुंभार, राष्ट्रवादीच्या शहर महिला अध्यक्ष रेखा आवळे, पूजा साळोखे, वैभव जाधव, युवराज साळोखे, नागेश फराडे, जहांगीर अत्तार, बाबू घाटगे, ओंकार माने, कोल्हापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष सूर्यकांत पाटील, सौ. जहिदा मुजावर, उदयराव जोशी, राष्ट्रवादीचे इचलकरंजी शहराध्यक्ष सुहास जांभळे, कार्याध्यक्ष अमित गाताडे, करवीर तालुकाध्यक्ष शिवाजीराव देसाई, करवीर विधानसभा अध्यक्ष संभाजीराव पाटील, दक्षिण विधानसभा अध्यक्ष आप्पासाहेब धनवडे, गगनबावडा तालुकाध्यक्ष दिलीप पाटील, इचलकरंजी नगरसेवक प्रकाश पाटील, जयसिंगराव चव्हाण, दिनकरराव कोतेकर, प्रवीण काळबर आदी प्रमुखांसह विविध पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी अस्थींचे दर्शन घेतले.
………….

*कोल्हापूर: महाराष्ट्राचे दिवंगत उपमुख्यमंत्री नामदार स्वर्गीय कै. अजितदादा पवार यांच्या अस्थिकलशाचे पूजन फुले वाहून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी अस्थिकलश व प्रतिमेचे पूजन केले.*
===========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!