पंचगंगा स्मशानभूमीत ‘जादू ग्रुप’तर्फे शेणी दान उपक्रम संपन्न

Spread the news

पंचगंगा स्मशानभूमीत ‘जादू ग्रुप’तर्फे शेणी दान उपक्रम संपन्न

­

 

कोल्हापूर: प्रतिनिधी
सामाजिक बांधिलकी आणि पर्यावरण रक्षणाचा संदेश देत, येथील ‘जादू ग्रुप’च्या वतीने पंचगंगा स्मशानभूमी येथे ‘शेणी दान’ उपक्रम उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे स्मशानभूमीतील इंधनाची गरज पूर्ण करण्यासाठी ग्रुपच्या वतीने मोलाचे योगदान देण्यात आले.

  •  

या उपक्रमाचे वैशिष्ट्य म्हणजे ‘जादू ग्रुप’चे लहानांपासून थोरांपर्यंत सर्व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सामाजिक कार्याची आवड आणि निस्वार्थ सेवेची भावना उराशी बाळगून सर्व सदस्यांनी या श्रमदानात आणि दान उपक्रमात सहभाग नोंदवला.

स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी लाकडांसोबतच शेणींचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो. इंधनाची ही गरज ओळखून जादू ग्रुपने हा स्तुत्य उपक्रम हाती घेतला. यावेळी बोलताना ग्रुपच्या सदस्यांनी सांगितले की, “समाजाप्रती आपले काही देणे लागते, याच भावनेतून आम्ही वेळोवेळी अशा उपक्रमांचे आयोजन करत असतो. आजच्या उपक्रमात बाल सदस्यांच्या सहभागामुळे त्यांनाही सामाजिक कार्याची गोडी लागेल.”
या उपक्रमाचे पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील नागरिक आणि प्रशासकीय कर्मचाऱ्यांकडून कौतुक होत आहे. ‘जादू ग्रुप’च्या या पुढाकारामुळे सामाजिक कार्याचा एक नवा आदर्श समोर आला आहे..


Spread the news

You may also like

error: Content is protected !!