एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून आई-वडिलांप्रती कृतज्ञता; भैरोबाच्या माळावर वृक्षारोपण

Spread the news

‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमातून आई-वडिलांप्रती कृतज्ञता; भैरोबाच्या माळावर वृक्षारोपण

­

 

भुये, ता. करवीर : केंद्र शासनाच्या ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेला अनुसरून भैरोबाच्या माळावर वृक्षारोपणाचा आगळावेगळा उपक्रम उत्साहात पार पडला. आपल्या आई-वडिलांप्रती प्रेम, आदर आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या न्यू मॉडेल इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

  •  

उपक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी आई-वडिलांच्या नावाने वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संकल्प केला. यावेळी विद्यार्थ्यांनी फळझाडांसह विविध देशी वृक्षांची रोपे तसेच फळांच्या बियांचे सीडबॉल तयार करून आणले होते.

भैरोबा च्या माळावरील टेकडी परिसरात देशी वृक्षांची लागवड करण्यात आली, तर तळ्याकाठी विविध फळझाडे लावण्यात आली. भविष्यात या परिसरात येणाऱ्या नागरिकांना तसेच पक्षी व वन्यजीवांना फळांचा लाभ व्हावा आणि जैवविविधतेला चालना मिळावी, या उद्देशाने फळझाडांची लागवड करण्यात आली.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांची आपल्या मातीशी नाळ अधिक दृढ झाली असून, पर्यावरण संवर्धनाची जाणीवही त्यांच्या मनात रुजली. त्याचबरोबर आई-वडिलांविषयी कृतज्ञता व्यक्त करण्याची संधी मिळाल्याने विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला.

या वैशिष्ट्यपूर्ण आणि नाविन्यपूर्ण उपक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे
“या उपक्रमासाठी संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. कौस्तुभ गावडे यांचे मार्गदर्शन लाभले.”
या उपक्रमा मध्ये सौ. परिमल पाटील.सौ. आरसीया बागवान,सौ. अर्चना कबनूरे संजय कुराडे.रिमित कुटीनो विनायक गवळी.
आणि श्री. सुधर्म देसाई व स्कूलआणि ज्युनिअर कॉलेजचे विध्यार्थी यांनी सहभाग घेतला
या प्रसंगी भैरोबा वृक्षारोपण व वृक्षसंवर्धन समितीचे अमर पाटील, भुयेवाडीचे माजी सरपंच तानाजी पाटील, पै. सुभाष साळोखे, पै.यशराज पाटील, सचिन पाटील, दिपक पाटील, परशुराम बाडकर, भुये येथील ग्रामस्थ तसेच भैरोबा भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!