राज्यस्तरीय डिपेक्स या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये केआयटी प्रथम

Spread the news

राज्यस्तरीय डिपेक्स या राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये केआयटी प्रथम

­

 

महोदय,
नुकत्याच ५-८ मार्च २६ रोजी छत्रपती संभाजीनगर येथे संपन्न झालेल्या राज्यस्तरीय ‘डिपेक्स’ या प्रोजेक्ट स्पर्धे मध्ये केआयटी विजेते. या संदर्भातील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकातून समाजापर्यंत पोहोचावी ही विनंती.

  •  

संचालक

‘डिपेक्स’ मध्ये केआयटी प्रथम
राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये वेस्ट मॅनेजमेंट विभागात प्रथम पारितोषिक

छत्रपती संभाजी नगर येथे ५-८ मार्च २६ रोजी संपन्न झालेल्या सृजन,कौशल्य विभाग मंत्रालय,महाराष्ट्र राज्य व एम.आय.टी.कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित राज्यस्तरीय डिपेक्स-२६ या प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये येथील केआयटी अभियांत्रिकी (प्रदत्त स्वागत) महाविद्यालयाच्या मेकॅनिकल विभागातील विद्यार्थ्यांनी वेस्ट मॅनेजमेंट या विभागात सर्वोत्कृष्ट प्रोजेक्टचा बहुमान मिळवला.राज्यभरातून आलेल्या जवळपास ७० महाविद्यालयांशी स्पर्धा करत हा बहुमान केआयटी ने पटकावला आहे.

‘वॉल माऊंटेड वेस्ट श्रेडिंग मशीन’ या प्रोजेक्टच्या माध्यमातून घरामध्ये दररोज निर्माण होणाऱ्या किचन वेस्ट साठी एक छोटे व सहज वापरण्यायोग्य मशीन बनवलेले आहे.ज्यातून एखाद्या अपार्टमेंटमध्ये निर्माण होणारे किचन वेस्ट सुद्धा अगदी थोड्या वेळात कंपोस्ट बेड साठी इनपुट मटेरियल म्हणून वापरले जाऊ शकते. शैक्षणिक व उद्योग क्षेत्रातील तज्ञ परीक्षकांकडून याचे मूल्यांकन केले गेले. या प्रोजेक्ट टीम मध्ये सुयश तुपे, सोहम बिरंजे,स्वानंद शिंदे आणि सायली कांबळे या विद्यार्थ्यांचा सहभाग होता.प्रा.अमित वैद्य यांनी या प्रोजेक्टचे मार्गदर्शक म्हणून काम केले. विजेत्या विद्यार्थ्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्या हस्ते स्मृतिचिन्ह, रोख पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आले. राज्यस्तरातून आलेल्या अनेक इंक्युबेटर्स, स्टार्टअप प्रमोटर यांनी या प्रोजेक्ट व्यावसायिक दृष्टीकोनातून सर्व प्रकारचे आर्थिक,तांत्रिक सहकार्य करण्याची तयारी दाखवलेली आहे.

अशा स्पर्धेत पारितोषिके जिंकणे हे केआयटीमध्ये विकसित झालेल्या दृष्टी आणि संस्कृतीप्रती विद्यार्थ्यांच्या समर्पणाचे दर्शन घडवते. फक्त स्पर्धेमध्ये सहभाग घेणेया पुरतेच मर्यादित न राहता विद्यार्थी आता त्या प्रोजेक्टच्या माध्यमातून उद्योजकीय प्रेरणा घेऊन स्टार्टअप चा विचार करू लागलेले आहेत अशा भावना संचालक डॉ.मोहन वनरोट्टी यांनी व्यक्त केल्या.विभागाचे विभाग प्रमुख डॉ.उदय भापकर, संस्थेचे अध्यक्ष श्री साजिद हुदली, उपाध्यक्ष श्री सचिन मेनन, सचिव श्री दीपक चौगुले यांचे मोलाचे प्रोत्साहन यासाठी मिळाले.

फोटो तपशिल:-
डिपेक्स-२६ राज्यस्तरीय प्रोजेक्ट स्पर्धेमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी चे कुलगुरू डॉ.कारभारी काळे यांच्या हस्ते वेस्ट मॅनेजमेंट विभागातील प्रथम पुरस्कार स्विकारताना केआयटी कॉलेजचे स्पर्धक विद्यार्थी. सोबत डावीकडून सेक्रेटरी यूजीसी डॉ.मनीष जोशी,अध्यक्ष सृजन, श्री.राम भोगले व अन्य आयोजक,पदाधिकारी.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!