Spread the news

खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्थेस ३ कोटी ६५ लाखावर नफा
चेअरमन साताप्पा कासार यांची माहिती

­

 

कोल्हापूर : खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक सहकारी पतसंस्था कोल्हापूर या पतसंस्थेला सन २०२५-२०२६ या आर्थिक वर्षात ३ कोटी ६५ लाख ७९ हजार ३३७ इतका विक्रमी नफा झाला आहे. अशी माहिती चेअरमन साताप्पा कासार यांनी दिली.
पतसंस्थेच्या संचालक मंडळाची मासिक मीटिंग पतसंस्था कार्यालयात नुकतीच पार पडली .यावेळी माहिती देताना चेअरमन साताप्पा कासार म्हणाले की, संस्थापक भरत रसाळे सर यांच्या मार्गदर्शनानुसार काटकसरीचा व पारदर्शी कारभार . करून कर्जाची वसूली चिकाटीने केलेली आहे . त्यामुळे चालू आर्थिक वर्षात पतसंस्थेने साडेसहाशे कोटी रुपयांच्यावर व्यवहार करून चालू वर्षी नफ्याचा तीन कोटी पन्नास लाखाचा विक्रमी टप्पा पार केलेला आहे . याचे श्रेय सर्व सभासदांना आहे.
यावेळी बोलताना संस्थापक व तज्ञ संचालक भरत रसाळे म्हणाले की,संचालक मंडळाने नेहमीच सभासदांच्या हिताचा विचार करून कारभार केलेमुळे प्रतिवर्षाप्रमाणे यावर्षीही विक्रमी नफा झाला आहे यातून सभासदांना जास्तीत जास्त लाभ कसा देता येईल याचा विचार केला जाईल.१०० कोटीच्या वर ठेवी वाढवण्याचा संचालक मंडळाचा संकल्प यावर्षी पूर्णत्वास गेला असून पतसंस्थेकडे ११२ कोटीच्या ठेवी असल्याचे त्यांनी सांगितले. सभासद व ठेवीदार व पतसंस्थेचे कर्मचारी यांच्या सहकार्यामुळेच पतसंस्थेची घोडदौड सुरू आहे असेही त्यानी आवार्जून नमूद केले.
यावेळी व्हा .चेअरमन अमित परीट ,मा. सचिव श्री वसंत पाटील, संचालक सर्वस्वी मच्छिंद्र नाळे, सर्जेराव नाईक, कृष्णात चौगले , महादेव डावरे,शिवाजी सोनाळकर, रोहिणी येडगे, राजेंद्र कोरे, अरुण गोते, कार्यकारी संचालक सदाशिव साळवी व कर्मचारी उपस्थित होते

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!