वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांची नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयास भेट
इमारत बांधकाम पाहणीसह शैक्षणिक व प्रशासकीय कामकाजाचा घेतला आढावा
नंदुरबार, दि. ३०:
महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसनसाहेब मुश्रीफ यांनी आज शुक्रवार दि.३० एप्रिल, २०२६ रोजी नंदुरबार येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला भेट दिली. या भेटीत मंत्री श्री. मुश्रीफ यांनी या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकाम सुरू असलेल्या इमारतीची पाहणी केली. तसेच; बैठकीत श्री. मुश्रीफ यांनी शैक्षणिक कामकाजासह प्रशासकीय कामकाजाचाही सविस्तर आढावा घेतला.




