मित्र संस्थेच्या महास्ट्राईड उपक्रमातून राज्यातील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राच्या शाश्वत विकासास गती देवू : मित्र संस्था उपाध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर

Spread the news

मित्र संस्थेच्या महास्ट्राईड उपक्रमातून राज्यातील पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्राच्या शाश्वत विकासास गती देवू : मित्र संस्था उपाध्यक्ष, आमदार राजेश क्षीरसागर

­

 

राज्यातील पर्यटन विकासासाठी संस्थात्मक चौकट अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने डी.एम.ओची स्थापना; मित्र संस्थेच्यावतीने डी.एम.ओ कार्यान्वयन कार्यशाळा संपन्न

  •  

मुंबई, दि. १२ : जागतिक बँकेच्या सहाय्याने राज्य शासनाच्या महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेच्या वतीने महास्ट्राईड उपक्रम राबविला जात आहे. याद्वारे राज्याच्या अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी विविध प्रयोजने, प्रकल्प हाती घेण्यात आली आहेत. महास्ट्राईड उपक्रमाद्वारे राज्यातील प्रत्येक जिल्ह्याला आर्थिक विकासाचे इंजिन बनवण्याचे ध्येय आहे. याद्वारे पर्यटन आणि सांस्कृतिक वारशाचे जतन करून त्यातून रोजगार निर्मिती आणि शाश्वत प्रगती साधली जाणार असल्याची माहिती मित्र संस्थेचे उपाध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली.

जागतिक बँकेच्या सहाय्याने राबविण्यात येत असलेल्या “महास्ट्राईड” उपक्रमांतर्गत, पर्यटन विभाग तसेच सांस्कृतिक कार्य विभाग हे अंमलबजावणी करणारे विभाग असून, पर्यटन विकासासाठी संस्थात्मक चौकट अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने “डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन (DMO)” स्थापन करून कार्यान्वित करण्यासंबंधीच्या निधी वितरणाशी जोडलेल्या निकषाची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी त्यांच्यावर सोपविण्यात आली आहे. या अनुषंगाने ट्रायडंट हॉटेल, नरिमन पॉइंट, मुंबई येथे आज “डी.एम.ओ. कार्यान्वयन कार्यशाळेचे” आयोजन करण्यात आले होते.

याप्रसंगी बोलताना आमदार राजेश क्षीरसागर पुढे म्हणाले कि, ‘महास्ट्राईड’ प्रकल्प हा जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने राबविला जात असून, यासाठी सुमारे कोट्यावधी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या निधीचा मोठा हिस्सा जिल्हास्तरावरील पायाभूत सुविधा आणि सेवा सुधारण्यासाठी वापरला जाणार आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील पर्यटन विकासासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही, अशी ग्वाही दिली. कोल्हापूर जिल्ह्यास धार्मिक, ऐतिहासिक, सांस्कृतिक व नैसर्गिक पर्यटनाचा समृद्ध वारसा लाभलेला असून, या सर्व पर्यटन स्थळांचा एकात्मिक विकास करून जागतिक दर्जाचे पर्यटन केंद्र म्हणून कोल्हापूरची ओळख निर्माण करण्यासाठी शासन सकारात्मक असून आवश्यक त्या सर्व योजना, निधी व धोरणात्मक सहकार्य उपलब्ध करून दिले जाईल, असे त्यांनी नमूद केले.

सदर कार्यशाळेमध्ये DMO ची संकल्पना, रचना, प्रशासन व्यवस्था व कायदेशीर चौकट तयार करणे, DMO साठी महसूल व शाश्वतता मॉडेल, भागधारकांचे प्रतिनिधित्व व खासगी क्षेत्राचा सहभाग निश्चित करणे, महाराष्ट्रातील “इव्हेंट इकॉनॉमी” विकास करणे, पर्यटन व सांस्कृतिक क्षेत्रातील भागधारकांसाठी कौशल्य व क्षमता विकास आराखडे तयार करणे आदी विषयांवर विशेष भर देण्यात आला.

या बैठकीस माजी सहकार मंत्री आमदार दिलीप वळसे पाटील, मित्र संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी, महास्ट्राईड प्रकल्पाचे संचालक अमन मित्तल पर्यटन आणि सांस्कृतिक कार्य विभागाचे प्रधान सचिव संजय जगन्नाथ खंदारे, महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या संस्थापक कुलगुरू डॉ.अपूर्वा पालकर, जागतिक बँकेच्या प्रतिनिधी सौ.नेहा गुप्ता, एम.टी.डी.सीचे व्यवस्थापकीय संचालक निलेश गटने आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!