शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का आप चा आयुक्तांच्या बैठकीत सवाल

Spread the news

शंभर कोटी रस्ते प्रकल्पातील कामे अपूर्ण का

­

 

आप चा आयुक्तांच्या बैठकीत सवाल

  •  

शहरातील विविध प्रश्नांवर आम आदमी पार्टीच्या शिष्टमंडळाने आयुक्त डॉ. राजेंद्र भारूड यांची भेट घेतली. दोन वर्षांपूर्वी सुरु झालेला शंभर कोटी रस्ते प्रकल्प अद्याप पूर्ण झाला नसून, गटार चॅनेल टाकणे, सील कोट मारणे ही कामे अद्याप झाली नसल्याचे आयुक्त भारूड यांच्या निदर्शनास आणून दिले.

पदभार स्विकारल्यापासून आयुक्तानी अनेक शहर उपयोगी निर्णय घेतले. याबद्दल आप च्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले.

महापालिकेत गेली अनेक वर्षे भरती न झाल्याने शेकडो पदे रिक्त आहेत. त्यामुळे नागरिकांना सेवा देणे शक्य होत नाही. सेवा नियम अंतिम न झाल्याने भरती झालेली नाही. यासाठी नगरविकास विकास विभाग तसेच अतिरिक्त मुख्य सचिवांकडे पाठपुरावा करावा अशी मागणी करण्यात आली.

टिप्पर चालकांच्या कंत्राटात घोटाळा झाला असून त्याची चौकशी अद्याप पूर्ण झालेली नाही. नवीन टेंडर काढताना चौकशी सुरु असलेल्या कंपन्यांना काम देऊ नये अशी मागणी आप ने केली.

भटक्या कुत्र्यांसाठी तयार होणारे डॉग शेल्टरची फक्त चर्चाच आहे पण अंमलबजावणी नाही. कुत्र्यांच्या नसबंदी साठी अधिक डॉक्टर्स घेऊन मोहीम राबवावी.

शहरातील हवा सुधारण्यासाठी तब्बल 18 कोटी रुपये खर्च करून देखील हवे मध्ये सुधारणा झालेली नाही. हवा प्रदूषण नियंत्रणासाठी ट्रक माऊंटेड स्विपिंग मशीन घ्यावे.

मालमत्ता कराच्या कक्षेत अधिकाधिक मिळतकी आणण्यासाठी मालमत्तांचे रिविजन सर्वे पूर्ण करावा.

ई बस खरेदीला गती द्यावी.

पाणी गळती शोधण्यासाठी टास्क फोर्स नेमून दर महिन्याला त्याचा आढावा घ्यावा.

ब्युरो ऑफिस, विभागीय कार्यालय, टी पी कार्यालय व पवडी विभागात ई गव्हर्नन्स सिस्टीमचा वापर अनिवार्य करा.

वर्कशॉप विभागातील मुदत बाह्य झालेली वाहने, महापालिकेच्या अनेक आस्थापनांमधील, शाळांमधील स्क्रॅप साहित्याची विल्हेवाट लावावी अशा मागण्या करण्यात आल्या.

टिप्पर चालकांच्या प्रश्नावर तातडीची बैठक लावण्याचे आश्वासन आयुक्तानी दिले.

यावेळी आप चे प्रदेश संघटन सचिव संदीप देसाई, शहराध्यक्ष उत्तम पाटील, महासचिव अभिजित कांबळे, संजय नलवडे, दुष्यंत माने, विजय हेगडे, राकेश गायकवाड, इस्थेर कांबळे, मयूर भोसले, शिवानी गजबर, प्रथमेश सूर्यवंशी आदी उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!