Spread the news

 

­

 

 

  •  

कोल्हापूर

इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया ,कोल्हापूर शाखा,  एमएसएमई, स्टार्टअप कमिटी यांच्या संयुक्त विद्यमाने दोन जुलै 2026 रोजी कोल्हापुरात ‘उत्थान- एमएसएमई महोत्सव ‘ आयोजित केला आहे अशी माहिती चार्टर्ड अकाउंटंटस ऑफ इंडिया कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सीए आशिष सेवेकरी यांनी दिली.
हॉटेल  पॅवेलियन येथील मधुसूदन हॉल येथे हा महोत्सव होणार आहे. या महोत्सवात देशभरातील नामांकित सीए, तज्ञ वक्ते सहभागी होणार आहेत. कोल्हापूर शाखेचे अध्यक्ष सेवेकरी म्हणाले,  यंदाच्या महोत्सवची संकल्पना विविध घटकांना एकत्र आणून  सामुहिक विकास साधने हा आहे. हा महोत्सव त्याच विचाराचा एक भाग असून उद्योग, व्यवसायिक,  बँका आणि सरकार यांच्यातील समन्वय अधिक मजबूत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. एक दिवस चालणाऱ्या या महोत्सवामध्ये विविध सरकारी योजना व संधी,  वित्तपुरवठा व गुंतवणूक, केंद्र व राज्य सरकारच्या अनुदान योजनेविषयी मार्गदर्शन केले जाणार आहे . तसेच उद्योग क्षेत्रातील नेटवर्किंगच्या संधी,  उद्योग वाढीसाठी नावीन्यपूर्ण उपाययोजना यासंदर्भात परिसंवाद व सत्रे आयोजित केले आहेत. सीए चंदन लाहोटी हे ‘ एमएसएमई आयपीओ आणि उपलब्ध वित्तपुरवठा’, धनेश राळे हे ‘ एम एस एम इ उद्योजकांना उद्भवणाऱ्या समस्या व त्यावरील उपाय योजना’ तर सीए यतिराज मर्दा हे ‘केंद्रीय आणि राज्य सरकारच्या प्रोत्साहन योजना’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. या महोत्सवातील सहभागासाठी नोंदणी आवश्यक आहे. पत्रकार परिषदेला कोल्हापूर शाखेचे उपाध्यक्ष आलोक शहा,  सचिव राघवेंद्र बकरे, व्यवस्थापन समिती सदस्य नितीन हरगुडे , सीए निलेश भालकर, शाखा व्यवस्थापक स्वप्निल सादळे आदी उपस्थित होते. नोंदणीसाठी आयसीएआय कोल्हापूर शाखेने विशेष ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध केले आहे अधिक माहितीसाठी सीए भवन 80 10 75 0 597 व स्वप्नील साबळे 87 96 24 32 73 यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!