छत्रपती शिवाजी महाराजांच्या घोषणांनी कोल्हापूर विमानतळ दणाणले.
ना.रामदास आठवले यांनी “शिवाजी कोण होता” चे वितरण केले.
कोल्हापूर दि. ५-
रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांचा… विजय असो, भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा…विजय असो… अशा घोषणांनी आज कोल्हापूर विमानतळाचा परिसर दणाणून गेला.
निमित्त होते केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचे कोल्हापूर विमानतळावरील भव्य स्वागत आणि रिपब्लिकन पक्षाचे महाराष्ट्र राज्य संघटन सचिव प्रा. शहाजी कांबळे यांच्या जाहीर आव्हानातील कॉम्रेड गोविंदराव पानसरे लिखित आणि प्रशांत आंबी प्रकाशित “शिवाजी कोण होता” या पुस्तकाचे जाहीर वितरण आणि वाचन.
कोल्हापूर, सातारा सांगली आणि सोलापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आज केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री नामदार रामदास आठवले यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन झाले या निमित्ताने त्यांचा स्वागत आणि सध्या महाराष्ट्रात चर्चेत असलेले रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आणि महापुरुषांच्या प्रतिमा चरित्र डागाळण्याचे कुटिल षडयंत्र भीमसैनिकच थांबवू शकतील अशी घोषणा कोल्हापुराच्या ऐतिहासिक दसरा चौकात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटाचे पदाधिकारी यांनी जाहीर केले होते. त्यानिमित्ताने रिपब्लिकन पक्षाची विचारधारा ही महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीबा ज्योतिबा फुले,छत्रपती शाहू महाराज,लोकशाहीर अण्णाभाऊ साठे,यांच्या विचाराने जात असताना स्वराज्याचे संस्थापक रयतेचे राजे छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहेत त्यांचा अवमान भीमसैनिक खपवून घेणार नाही ही भूमिका रामदासजी आठवले साहेब यांना प्राध्यापक शहाजी कांबळे यांनी मांडली आणि आठवले साहेबांनी शिवाजी कोण होता या पुस्तकाचे पुन्हा वितरण करून सर्व कार्यकर्त्यांना छत्रपती शिवराय आणि भीमराय विचारधारा समाजात रुजवण्याचे आदेश दिले
यावेळी स्वराज्य संविधान शिल्पचे मनेर माळ येथे झालेल्या जिल्हा सचिव सतीश माळगे यांच्या पुढाकाराने साकारलेल्या शिल्प उद्घाटन कार्यक्रमाची माहिती कार्यक्रमाचे अध्यक्ष आणि रिपब्लिकन पक्षाचे जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ यांनी ना. रामदासजी आठवले यांना अहवाल दिला.
स्वागत पक्षाचे राज्याचे नेते प्राध्यापक शहाजी कांबळे,जिल्हा कार्याध्यक्ष दत्ता मिसाळ, जिल्हा सचिव सतीश माळगे, जिल्हा उपाध्यक्ष संजय जिरगे, रिपब्लिकन एम्प्लॉईज फेडरेशनचे जिल्हाध्यक्ष डॉक्टर कृष्णात पुंडलिक उर्फ बटू भामटेकर राधानगरी नेते कुंडलिक कांबळे, कागलचे बाबासाहेब कागलकर, अलंकार माने,प्रवीण आजरेकर रोहित घोडके सौरभ कांबळे,आदित्य डोने,ओंकार भंडारे यांच्यासह रिपब्लिकन कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.




