जत तालुक्यातील मोटेवाडी (आसंगी तुर्क) येथे श्री मुरगुबाई देवीच्या यात्रेदरम्यान वादळी वाऱ्यामुळे मंदिराची भिंत कोसळून घडलेली दुर्घटना अत्यंत दुःखद, वेदनादायी आणि मन सुन्न करणारी आहे. या घटनेने संपूर्ण जत तालुका हादरून गेला असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
या दुर्घटनेत जखमी झालेल्या भाविकांवर मिरज व सांगली येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आज मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या समवेत रुग्णालयात जाऊन जखमी बांधवांची भेट घेतली, त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली व त्यांना धीर देण्याचा प्रयत्न केला.
जखमी भाविक पूर्णपणे बरे होईपर्यंत आम्ही त्यांच्या सोबत ठामपणे उभे आहोत. उपचारासाठी किंवा प्रशासनाच्या माध्यमातून कोणतीही मदत कमी पडू देणार नाही, असा विश्वास मा. पालकमंत्री चंद्रकांतदादा यांनी यावेळी दिला. दुःखाच्या या कठीण प्रसंगी शासन, प्रशासन आणि आम्ही सर्वजण पीडित कुटुंबांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहोत.
ईश्वर चरणी प्रार्थना करतो की, दिवंगत आत्म्यांना सद्गती लाभो आणि जखमी भाविकांना लवकरात लवकर पूर्णपणे बरे होण्याचे बळ प्राप्त होवो.
या वेदनेच्या क्षणी भाविकांच्या डोळ्यातील अश्रूंमध्ये आम्हीही तितकेच सहभागी आहोत…




