महादेव डावरे यांचे कार्य शिक्षकांना दिशादर्शक : भरत रसाळे
कोल्हापूर :महादेव डावरे यांचे कृतिशील शिक्षक म्हणून केलेले कार्य इतर शिक्षकांना दिशादर्शक आहे असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समितीचे राज्याध्यक्ष भरत रसाळे यांनी केले . ते विद्यामंदिर शाहूपरी कोल्हापूर या शाळेतील इंग्रजीचे अध्यापक महादेव डावरे यांच्या सेवानिवृत्ती समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते .कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे अध्यक्ष डी .बी .कोपार्डेकर होते . तर मान्यवर पाहुणे म्हणून राज्याचे माजी शिक्षण संचालक महावीर माने , माजी सहाच्यक शिक्षण संचालक व्ही .बी . पायमल संस्थेच्या सचिव सुधा कोपार्डेकर , खाजगी शिक्षक पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार हे होते .
यावेळी बोलताना भरत रसाळे म्हणाले की, “महादेव डावरे यांनी 38 वर्षाच्या आपल्या सेवेमध्ये इंग्रजीचे अध्यापक म्हणून केलेल्या उतम कार्यामुळे .त्यांचे अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवा , उद्योग , कला, राजकारण व सामाजिक क्षेत्रामध्ये चमकत आहेत ..शिक्षकीपेशा व्रत म्हणून जगलेल्या महादेव डावरे यांनी आपल्या स्वयंशिस्तीतून जे धडे स्वतःच्या कृतीतून दिलेत ते इतर शिक्षकांना दिशादर्शक आहेत “.
यावेळी माजी शिक्षण संचालक महावीर माने , व्ही बी .पायमल , सुधा कोपार्डेकर, नगरसेवक अभिजीत खतकर , अभय तेंडूलकर,अदिती केळकर, शिवाजी भोसले , शितल हिरेमठ, के .व्ही पाटील, यांनी शुभेच्छापर मनोगते व्यक्त केली .
सत्काराला उतर देतांना महादेव डावरे यांनीआई-वडिलांचे संस्कार ,पत्नीचे सहकार्य, संस्था आणि शिक्षक चळवळतील शिक्षकांचे प्रेम यामुळे चांगल्या उमेदीने काम करू शकलो याचे समाधान वाटते अशी भावना व्यक्त केली .
प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक एस एस . पाटील यांनी केले .आभार पतसंस्थेचे चेअरमन साताप्पा कासार यांनी मानले तर सूत्रसंचालन शिवाजी सोनाळकर यांनी केले .या कार्यक्रमास विविध संस्थांचे पदाधिकारी , मुख्याध्यापक , शिक्षक व आप्तेष्ठ मोठ्या संख्येने उपस्थित होते
. ……
मा संपादक सो
वरील वृत्त आपले लोकप्रिय दैनिकातून प्रसिद्ध करावे अशी विनंती आहे .
आ .वि .
महादेव डावरे (विभागीय अध्यक्ष ) महाराष्ट्र राज्य खाजगी प्राथमिक शिक्षक सेवक समिती




