Spread the news

महाराष्ट्र दारूबंदी संघर्ष समिती

­

 

  •  

पुणे हडपसर मध्ये पांढरे मळा व फुगेवाडी येथे विषारी दारू प्यायल्यामुळे १५ लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याला जबाबदार महाराष्ट्राचे गृहमंत्री, पोलीस प्रशासन व उत्पादन शुल्क विभाग आहे. अजूनही काही लोकोपचार घेत असल्याने दगावणाऱ्यांचा आकडा वाढू शकतो. एक मोठे षडयंत्र शिजत आहे महाराष्ट्राला कायदेशीर बेकायदेशीर दारू प्यायला भाग पाडून तरुणांना ड्रग्स व गांजाच्या आहारी जायला लावून संपूर्ण महाराष्ट्र हा व्यसनाच्या विळख्यामध्ये ढकलायचा आहे. या विरोधात गृहमंत्री मात्र गप्प आहेत. मागील वर्षी 48 हजार कोटींचा कायदेशीर दारूचा महसूल गोळा केला आहे. त्याबरोबरच पोलिस हप्ता वसुली करत बेकायदेशीर दारूला देखील अभय देतात. महाराष्ट्रातील एकूण दारू पैकी 30 % दारू ही बेकायदेशीर दारू आहे.कष्टकरी शेतमजूर कामगार अशा बेकायदेशीर विषारी दारूला बळी पडतात. योगेश वानखेडे या एका व्यक्तीला अटक करून चालणार नाही तर यामागे असणारी एक सिस्टम व्यवस्था ही नष्ट करावी लागेल. ती इच्छाशक्ती सरकारमध्ये नाही त्यामुळे लोकांनी सातारा रस्त्यावर उतरावे.- गिरीश फोंडे, निमंत्रक, महाराष्ट्र दारूबंदी संघ समिती( 8830223485)


Spread the news

You may also like

error: Content is protected !!