मराठी शाळा वाचवा, खासगी ‘अकॅडमी’चे दुकान बंद करा!
राज्यातील मराठी माध्यमांच्या शाळा सध्या अस्तित्वाची लढाई लढत असून, दुसरीकडे गल्लोगल्ली फुटलेल्या खासगी ‘अकॅडमी’ पालकांचे खिसे रिकामे करत आहेत. या गंभीर परिस्थितीकडे शासनाने लक्ष द्यावे
“दुकानदारी शिक्षणाची की कत्तल गुणवत्तेची?” याचा विचार शासन का करीत नाही ‘अकॅडमी’ च्या जाळ्यात मराठी शाळांची कोंडी होत आहे,
मराठी शाळा सध्या ‘सलाईन ’वर आहेत. ज्या शाळांनी महाराष्ट्राला विचारवंत, शास्त्रज्ञ आणि नेते दिले, त्याच शाळा आज विद्यार्थ्यांअभावी ओस पडत आहेत.
खासगी क्लासेस आणि अकॅडमीनी शिक्षणाचे बाजारीकरण केले असून, शासनाने एकतर या खासगी अकॅडमी बंद कराव्यात किंवा शासनाने मराठी शाळांना कुलूप लावावे
शिक्षकांच्या व्यथा कोणाला कळत नाहीत का. जनगणना, निवडणुका, विविध सर्वेक्षणे आणि रोजच्या नव नवीन ऑनलाइन स्वरूप माहिती भरण्यामुळे शिक्षकांचा मूळ वेळ शिकवण्याऐवजी ‘डेटा एन्ट्री’मध्येच जात आहे. शासनाचे नव नवीन उपक्रम केवळ कागदावर मिरवण्यात शिक्षक व्यस्त असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेकडे दुर्लक्ष होत असल्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.
प्रमुख मागण्या
शासकीय स्पर्धा परीक्षा केंद्र :
जर खासगी अकॅडमी चालवणे ही काळाची गरज असेल, तर शासनाने स्वतःची मोफत ‘शासकीय अकॅडमी’ प्रत्येक जिल्ह्यात सुरू करावी.
अशैक्षणिक कामातून मुक्ती :
शिक्षकांना केवळ अध्यापनाचे काम देऊन त्यांच्यातील ‘गुरुजी’ जिवंत ठेवावा.
शाळांचे सक्षमीकरण :
मराठी शाळांमध्ये गुणवत्तापूर्ण, हुशार आणि स्पर्धा परीक्षांचे वर्ग सुरू करण्यासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करावी.
फी नियंत्रण :
खासगी क्लासेसच्या मनमानी फीवर तातडीने कायदेशीर लगाम लावावा.
शिक्षण हक्क :
आरटीई (RTE) कायद्यानुसार १ ली ते १२ वी पर्यंतच्या मुलांना मोफत शिक्षण मिळाले आणि कोणतेही मूल शिक्षणापासून वंचित राहणार नाही याची काळजी शासनाने घ्यावी.
गरीबांच्या स्वप्नांना बळ द्या
श्रीमंतांची मुले लाखो रुपये भरून कोचिंग घेऊ शकतात, पण शेतकरी आणि कष्टकऱ्यांच्या मुलांनी काय करावे? असा प्रश्न उपस्थित करत समितीने तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. जर वेळीच उपाययोजना केल्या नाहीत, तर भविष्यात केवळ ‘फी’ भरू शकणारेच साहेब होतील आणि बुद्धिमान गरीब मात्र शिक्षणापासून वंचित राहील,
अकॅडमी ची दुकाने बंद करा व मराठी शाळा वाचवा
अन्यथा महाराष्ट्रातील मराठी शाळांच्या रोषाला सामोरे जावे लागेल
खंडेराव जगदाळे





