समीर देशपांडे यांच्या ‘कोरोनाशी भिडताना’ पुस्तकातून उत्तम डॅाक्युमेंटेशन

Spread the news

­

हसन मुश्रीफ, मान्यवरांच्या हस्ते पुस्तकाचे प्रकाशन

  •  

कोल्हापूर : कोरोनाने काही वर्षांपूर्वी जगभर थैमान घातले. समीर देशपांडे यांनी त्यांच्या ‘कोरोनाशी भिडताना’ पुस्तकातून हा काळ पुन्हा उभा केला असून या महामारीचे उत्तम डॅाक्युमेंटेशन यानिमित्ताने झाले आहे असे प्रशंसोद्गार वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी काढले.

शेंडा पार्क येथील राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पत्रकार समीर देशपांडे यांनी लिहिलेल्या ‘कोरोनाशी भिडताना’ या पुस्तकाचे प्रकाशन मंत्री मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते सोमवारी करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. सार्वजनिक आरोग्य मंत्री आणि कोल्हापूरचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. तर डाॅ. डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख डॅा. संजय डी. पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी पुस्तकाचे लेखक, वरिष्ठ पत्रकार समीर देशपांडे यांनी प्रास्ताविकामध्ये कोरोनाचा काळच उभा केला. कोरोनाकाळातील घुसमट, सर्वसामान्यांच्या अडचणी, उपचारावरील मर्यादा आणि शासकीय यंत्रणांनी केलेले काम याचा सविस्तर आढावा घेवून स्वत कोरोना पॅाझिटिव्ह आल्यानंतरचा प्रसंग सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. यामुळे सभागृहातील उपस्थितही हेलावले.

मुश्रीफ म्हणाले, स्वप्नातही पाहिला नाही असा एक काळ येउन गेला. तो कोरोना काळ देशपांडे यांनी जसाचा तसा मांडला. या रोगाशी कशा प्रकारे लढायचे हे माहिती नसताना सरकारी रुग्णालयातील डॉक्टर्स, पारिचारिका, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका यांनी या काळात केलेल्या धाडसी कामाला सलाम केला पाहिजे.

खासदार धनंजय महाडिक म्हणाले, कोरोनामुळे आपली जीवनशैलीच बदलून गेली आहे. उद्याची चिंता न करता आजचा दिवस जगला पाहिजे ही मानसिकता कोरोनाने शिकवली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लस निर्मितीसाठी दिलेले प्रोत्साहन विसरता येणार नाही. आमदार विनय कोरे म्हणाले, कोरोना काळात जीवाची पर्वा न करता भीतीचा हा सगळा प्रवास माणसाने अनुभवला. त्याचे उत्कृष्ट डॉक्युमेंटेशन या पुस्तकामुळे झाले आहे. आमदार चंद्रदीप नरके म्हणाले, कोरोनाने कठीण काळात भविष्यात येणाऱ्या संकटाशी कशाप्रकारे लढले पाहिजे याची जाणीव करुन दिली. यावेळी लोकमतचे कार्यकारी संपादक सचिन जवळकोटे यांनीही मनोगत व्यक्त केले.

वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे यांनी स्वागत केले. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष शिल्पा खोत, आमदार अशोकराव माने, यावेळी लोकमतचे सहायक उपाध्यक्ष मकरंद देशमुख

पुस्तकाचे लेखक समीर देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. भाजपचे प्रदेश कार्यकारणी सदस्य राहुल चिकोडे यांनी मंत्री चंद्रकांत पाटील यांचा संदेश वाचून दाखवला. यावेळी संजीवनी देशपांडे, स्मिता देशपांडे, अक्षर दालनचे प्रकाशक रवींद्रनाथ जोशी, अमेय जोशी, कॅप्टन वैभव देशपांडे, प्रणव देशपांडे, पं. विनोद डिग्रजकर, देवल क्लबचे अध्यक्ष व्ही. बी. पाटील, सावलीचे किशोर देशपांडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष तानाजी पाटील, शिक्षण सभापती शीतल यादव, महिला, बालकल्याण सभापती विद्या पाटील, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ओमप्रकाश यादव, मुख्य लेखा व वित्त अधिकारी अतुल आकुर्डे, भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील, उध्दवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, उध्दवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुनील शिंत्रे, महालक्ष्मी बॅंकेच्या उपाध्यक्षा पदमजा आपटे, कोल्हापूर फर्स्टचे चेअरमन सुरेंद्र जैन, जिल्हा पशूसंवर्धन उपायुक्त डाॅ. प्रमोद बाबर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.‌ संदीप मगदूम यांनी सूत्रसंचालन केले.

चौकट

कोरोना योध्यांच्या सत्कार

कोरोना काळातील अतुलनीय कामगिरीबद्दल यावेळी डाॅ. डी.वाय. पाटील ग्रुपचे प्रमुख संजय डी. पाटील यांचा मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. तसेच माजी आमदार राजेश पाटील, कोरोना योद्धा जाफरबाबा, वासीम चाबुकस्वार, राजू मेवेकरी, बंटी सावंत, अशोक रोकडे, दीपा शिपूरकर, छायाचित्रकार आदित्य वेल्हाळ, पुस्तकाचे रचनाकार गौरीश सोनार, आजऱ्याचे नगरसेवक परेश पोतदार, पुणे येथील महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सागर देशपांडे यांचा सन्मान करण्यात आला.

You may also like

error: Content is protected !!