‘गोकुळ’मध्ये हनुमान जयंती उत्साहात साजरी
कोल्हापूर, ता. २ : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध संघ (गोकुळ) च्या वतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयाच्या आवारातील श्री हनुमान मंदिरात हनुमान जयंती उत्साहात व भक्तिमय वातावरणात साजरी करण्यात आली. सकाळी साडेसहा वाजता हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी गोकुळचे संचालक कर्णसिंह गायकवाड व त्यांच्या पत्नी सौ. भाग्यश्री गायकवाड यांच्या हस्ते श्री हनुमान मूर्तीचे पूजन करण्यात आले. त्यानंतर पाळणा, रुद्राभिषेक व भजन आदी धार्मिक कार्यक्रम पार पडले.
या कार्यक्रमास संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे, बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील-चुयेकर, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, युवराज पाटील यांच्यासह पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. प्रकाश साळुंखे, संकलन व्यवस्थापक दत्तात्रय वागरे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अशोक पुणेकर, बाजीराव पाटील, निवास पाटील, बाळासो वायदंडे, संकेत खाडे, नितीन तोडकर,सुभाष नाळे, सर्वेश जाधव, अर्जुन पाटील, विनोद पाटील, बाळासो खांडेकर व इतर अधिकारी तसेच इतर अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.





