शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबीराचे आयोजन
छत्रपती शिवाजी महाराजांच्या 352व्या शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आम्ही आदमी पार्टीच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे हे सहावे वर्ष आहे.
ज्या स्वराज्याच्या निर्मितीसाठी मावळ्यांनी आपले रक्त सांडले, त्यांच्या स्मृतीना अभिवादन करण्यासाठी या शिबिराचे आयोजन दरवर्षी करण्यात येत असते. हे शिबीर छत्रपती शिवाजी चौक येथे होत असून, सकाळी दहा ते दुपारी दोन या वेळेत पार पडणार आहे. तरी सर्व शिवभक्तांनी या रक्तदान शिबिरामध्ये मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन आप तर्फे करण्यात आले आहे.
संदीप देसाई
प्रदेश संघटक
आम आदमी पार्टी महाराष्ट्र



