मुंबई (मंत्रालय) येथे महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली पन्हाळा तालुक्यातील सातवे येथील गट नं.१३८७/१/अ व १७१२/अ/१ बाबत आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली…
पन्हाळा तालुक्यातील सातवे या गावाला शासकीय गावठाण वाढ योजनेअंतर्गत तत्कालीन सहाय्यक जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांनी २७-०५-१९९१ अन्वये गट नंबर१३८७/१/अ व १७१२/अ/१ मध्ये गावातील गरीब व गरजू लोकांना एकूण ४४३ भूखंड वाटप करण्यात आले होते. परंतु अज्ञानामुळे व माहिती नसल्यामुळे शासनाने वाटप केलेले भूखंड अन्य अंदाजे ११८ व्यक्तींनी खरेदी केले आहेत. त्यामुळे अर्जदार यांचे नांव ७/१२ पत्रकी दाखल होणार नाहीत सदर व्यक्ती नियमानुसार आवश्यक ती रक्कम भरणेस तयार असून त्यासंदर्भातील प्रकरणे तहसिलदार, पन्हाळा यांचेकडे प्राप्त झालेली आहेत.तरी ११८ व्यक्तींनी खरेदी केलेले भूखंड त्याच्या नावे करणेची कार्यवाही लवकरात लवकर करावी अशी मागणी आमदार डॉ.विनय कोरे (सावकर) यांनी महाराष्ट्र राज्याचे महसूल मंत्री नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली.मा.मंत्री महोदय यांनी संबंधित अधिकाऱ्यांना ११८ व्यक्तींनी खरेदी केलेले भूखंड त्याच्या नावे करणेच्या सुचना दिल्या…




