आय.टी. पार्कची जागा “एम.आय.डी.सी.”च्या ताब्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

Spread the news

आय.टी. पार्कची जागा “एम.आय.डी.सी.”च्या ताब्यात : आमदार राजेश क्षीरसागर यांची माहिती

­

 

  •  

आमदार राजेश क्षीरसागर यांच्या सातत्याच्या पाठपुराव्यास यश

कोल्हापूर दि.२७ : कोल्हापूर शहरातील शेंडापार्क परिसरात आयटी क्षेत्राचा विकास साधण्यासाठी ३४.३६ हेक्टर शासकीय जमीन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाला (एमआयडीसी) देण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिली. त्यानुसार कोल्हापूर शहर परिसरातील ई वॉर्ड येथील मौजे कसबा करवीर येथील रि.स.नं.५८३, ५८७ व ५८८ मधील कृषी विभागाच्या ताब्यातील जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांना कब्जेहक्काने देण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

आय.टी.पार्कचा विषय जागेच्या दरामुळे रखडला जावू नये. तसेच सदर जागा कमीत कमी दरात उपलब्ध व्हावी, यासाठी आमदार राजेश क्षीरसागर प्रयत्नशील होते. परंतु, ३१ मार्च नंतर नवीन दराने जागेचे बाजारमूल्य सुमारे १५ % नी वाढण्याची शक्यता निर्माण झाली होती. त्यामुळे त्यापूर्वीच जागा हस्तांतरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आमदार राजेश क्षीरसागर सातत्याने प्रयत्नशील होते.

याकरिता सन २०२५ – २६ चे बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार सदर जमिनीचे एकत्रित मुल्यांकन र.रु.५,६०,२३,९८०/- इतके निश्चित करण्यात आले. सदर अधिमुल्याची रक्कम भरण्याची अंतिम मुदत दि.३१ मार्च २०२६ असून त्यानंतर अधिमुल्याची रक्कम नवीन सन २०२६ – २७ नुसार नवीन वार्षिक बाजार मुल्यदरानुसार भरावी लागणार असल्याचे पत्र महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास आज दि.३० मार्च रोजी प्राप्त झाले. याबाबत संबधित विभागाने सदर बाब राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष आमदार राजेश क्षीरसागर यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. याबाबत आमदार राजेश क्षीरसागर यांनी तात्काळ मा.उद्योग मंत्री आणि सचिव, उद्योग विभाग यांच्याकडे पाठपुरावा करून सदर रक्कम तात्काळ भरण्याबाबत मंत्रालय स्तरावरून निर्देश देण्याची मागणी केली. त्यानंतर शासकीय यंत्रणा गतिमान होवून १ एप्रिलच्या पूर्व संध्येला महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने बाजारमुल्य तक्त्यातील दरानुसार सदर जमिनीचे एकत्रित मुल्यांकन र.रु.५,६०,२३,९८०/- जिल्हाधिकारी कार्यालयाच्या महसूल विभागाकडे जमा केले.

त्याआनुषंगाने जिल्‍हाधिकारी कोल्‍हापूर यांचेकडून दिनांक ०२.०४.२०२६ रोजी सदरहू क्षेत्र महाराष्‍ट्र औद्योगिक विकास महामंडळास हस्‍तांतरण करणेबाबत आदेश निर्गमित करणेत आले होते. त्‍याप्रमाणे सदरहू क्षेत्राची प्रत्‍यक्ष मोजणी व सिमांकन करुन आज दिनांक २७.०५.२०२६ रोजी महसूल विभागाच्‍या वतीने श्री. संजय शिंदे, अति. जिल्‍हाधिकारी कोल्‍हापूर व स्‍वप्निल पवार, तहसलिदार करवीर, यांनी शेंडा पार्क येथील ३४.३६ हे.आर. क्षेत्राचा ताबा श्री. उमेश देशमुख प्रादेशिक अधिकारी म.औ.वि.म. कोल्‍हापूर व श्री. इराप्‍पा नाईक, कार्यकारी अभियंता म.औ.वि.म. कोल्‍हापूर, यांचेकडे सुर्पूत केला. आज सदर जागा महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या ताब्यात देण्यात आली असून, आय.टी. पार्क निर्मितीचा मार्ग आणखी सुकर झाला असल्याची माहिती आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!