शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे आज पहाटे निधन 

Spread the news

शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य व व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख डॉ. श्रीकृष्ण महाजन यांचे आज पहाटे निधन

­

 

अल्पपरिचय
डॉ. श्रीकृष्ण महाजन
डॉ. श्रीकृष्ण शंकर महाजन (जन्म १८ नोव्हेंबर १९६९; मृत्यू २२ एप्रिल २०२६) हे शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर येथील वाणिज्य आणि व्यवस्थापन अधिविभागाचे प्रमुख तथा वरिष्ठ प्राध्यापक होते. लेखांकन, वित्त आणि उद्योजकता या विषयांवर त्यांचे विशेष प्रभुत्व राहिले. शिवाजी विद्यापीठाच्या वाणिज्य आणि व्यवस्थापन विद्याशाखेचे अधिष्ठाता म्हणूनही त्यांनी काम पाहिले. त्यांनी निर्गुंतवणूक, उद्योजकीय वित्त आणि वित्तीय समावेशन यांसारख्या विषयांवर संशोधन केले. विद्यापीठाच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व विकास केंद्राचे संचालक तसेच सामाजिक समावेशन केंद्राचे संचालक म्हणूनही त्यांनी प्रभावी काम केले. अनेक महत्त्वपूर्ण पुस्तके प्रकाशित केली. अनेक समाजाभिमुख उपक्रम त्यांनी या केंद्रांच्या माध्यमातून राबविले. विद्यापीठासमवेत विविध आघाडीच्या आस्थापनांचे सामंजस्य करार घडवून आणण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली.
डॉ. महाजन यांनी आपले पदव्युत्तर तसेच पीएचडीचे शिक्षण शिवाजी विद्यापीठातूनच पूर्ण केले. आर्थिक समावेशन आणि उद्योजकीय वित्त या विषयांवरील संशोधन प्रकल्पांवर त्यांनी काम केले. निर्गुंतवणूक, वित्त व व्यवस्थापन, आर्थिक समावेशन इत्यादी विविध वाणिज्यिक संशोधनपर विषयांवर प्रसिद्ध झालेले आणि विविध परिषदांत सादर केलेल्या शोधनिबंधांची संख्या दीडशेहून अधिक आहे. त्यांची अनेक पुस्तकेही प्रकाशित आहेत.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!