कोल्हापुरात आयटी पार्कला मंजुरी; तरुणांसाठी नवे मार्ग खुले

Spread the news

कोल्हापूरच्या तरुणांसाठी आधुनिक संधी निर्माण करण्याची गरज अधोरेखित करत विधानभवनात मी कोल्हापूरच्या आय. टी. पार्कसाठी मागणी केली होती. शासनाकडे केलेल्या माझ्या सततच्या पाठपुराव्याला अखेर यश मिळालं आणि शासनाने आयटी पार्कसाठीचा जी.आर. मंजूर केला. कोल्हापूरच्या आय. टी. पार्कचा मार्ग मोकळा झाला.
या ऐतिहासिक निर्णयाच्या निमित्ताने आयटी असोसिएशन ऑफ कोल्हापूर (iTAK) यांच्या वतीने आयोजित कृतज्ञता व जाहीर सत्कार सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला. रेसिडेन्सी क्लब कोल्हापूर येथे पार पडलेल्या या कार्यक्रमात माझ्यासह कोल्हापूरच्या विकासासाठी झटणाऱ्या सर्व लोकप्रतिनिधींचा सन्मान करण्यात आला.
आजपर्यंत पारंपरिक आणि ऐतिहासिक ओळख असलेले कोल्हापूर आता तंत्रज्ञानाच्या नव्या युगात ठाम पाऊल टाकत आहे तसेच आयटी पार्कमुळे स्थानिक युवकांना रोजगाराच्या नव्या संधी उपलब्ध होतील, उद्योगांना चालना मिळेल आणि कोल्हापूरची ओळख ‘ऐतिहासिक नगरी’सोबतच ‘तंत्रज्ञाननगरी’ म्हणूनही दृढ होईल असा विश्वास मी व्यक्त केला.
यावेळी जिल्ह्याचे पालकमंत्री मा. प्रकाश आबिटकर, कोल्हापूर दक्षिणचे आमदार मा. अमल महाडिक, महापौर सौ. रुपाराणी निकम, नगरसेवक स्वरूप कदम, मा. श्री. सुरेंद्र जैन, मा. श्री. उमेश देशमुख प्रादेशिक अधिकारी एमआयडीसी, सां., शांताराम सुर्वे संस्थापक अध्यक्ष (iTAK), मा. श्री. अजयकुमार पाटील महाव्यवस्थापक जिल्हा उद्योग केंद्र, मा. श्री. प्रताप पाटील अध्यक्ष (iTAK), मा. श्री. धवल चौगुले उपाध्यक्ष (iTAK), मा. श्री. राहुल मेंच सेक्रेटरी (iTAK), मा. श्री. रणजीत नार्वेकर खाजणीस (iTAK), असोसिएशनचे सर्व संचालक : मा. श्री. आदिनाथ पाटील, मा. श्री. मंदार पेटकर, मा. श्री. विश्वजीत देसाई, मा. श्री. मनीष राजघोळकर, मा. श्री. प्रसन्न कुलकर्णी, मा. श्री. कैलास मेठे, मा. श्री. स्नेहल बियाणी आदी मान्यवर उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!