त्या आमदारांनी आयुष्यातले किती दिवस कुठे घालवलेत? नामदार हसनसाहेब मुश्रीफ प्रतिक्रिया…….!

Spread the news

 

­

 

त्या आमदारांनी आयुष्यातले किती दिवस कुठे घालवलेत?

  •  

नामदार हसनसाहेब मुश्रीफ प्रतिक्रिया…….!
आमदार शिवाजी पाटील यांनी मंत्री श्री. मुश्रीफ यांच्यावर केलेल्या टिकेबाबत त्यांच्याशी संपर्क साधला असता नंदुरबारमध्ये असलेले श्री. मुश्रीफ म्हणाले, चंदगडचे जे आमदार आहेत त्यांचे शिक्षण किती, त्यांचे पूर्वायुष्य काय याबद्दल सगळी माहिती मला आहे. त्यांनी आपल्या जीवनातील जास्तीत-जास्त दिवस कुठे खर्ची घातलेत, याचीही सविस्तर माहिती आम्हाला आहे. खरेतर मी त्याबद्दल फारसे काही बोलणारच नव्हतो. परंतु; ते नाहकरित्या सातत्याने जाणीवपूर्वक जास्तीत-जास्त माझ्यासह माझ्या मुलाबद्दल बदनामीकारक बोलत आहेत. एकदाचा त्यांचा सोक्षमोक्ष लावण्यासाठीच त्यांना मी हे शेवटचे उत्तर देत आहे. त्यानंतर मी त्यावर बोलणार नाही. त्यांनी हे जर थांबवलं नाही तर आम्ही आणि शिवसेनेच्या ज्यांच्यावर त्यांनी टीका केलेल्या आहेत, आम्ही मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीससाहेब यांना येत्या मंगळवारी, बुधवारी भेटून थेट विचारणार आहोत.

मी जिल्हा परिषदेच्या निवडणूक प्रचारात घेतलेल्या एका सभेमुळे त्यांच्या आठ जागा पडल्या हे त्यांचे दुःखही मी समजू शकतो. परंतु; ते ज्या पद्धतीने माझ्यासह माझ्या मुलाची जाणीवपूर्वक नाहक बदनामी करत आहेत. त्यामुळे आमचे लोक संतप्त झाले आहेत. त्यामुळे त्यांनी एक गोष्ट पक्की लक्षात ठेवावी. त्यांनी उभा केलेल्या उमेदवारांना आमचे लोक मते देतील, याची मी खात्री देऊ शकत नाही. ही गोष्टही आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत. कारण त्यांचा गैरसमज होऊ नये म्हणून.
==========


Spread the news

You may also like

error: Content is protected !!