केंद्र-राज्याच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा’-भाजप जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील
महेश पाटील यांची भाजप ग्रामीण (पश्चिम) उपाध्यक्षपदी निवड
कागल,प्रतिनिधी.
भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांच्या मेहनतीवर उभी राहिलेली संघटना आहे. ‘बूथ सशक्तीकरण अभियान’ राबविण्याबरोबर केंद्र व राज्य सरकारच्या कल्याणकारी योजना घराघरात पोहोचवा.
असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनी केले.
येथे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील सरचिटणीस,मंडल अध्यक्ष,प्रमुख पदाधिकारी यांच्या बैठकित ते बोलत होते. संघटनात्मक बांधणीला अधिक बळकटी देण्याच्या दृष्टीने महेश पाटील यांची भाजप जिल्हा ग्रामीण (पश्चिम) उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली.नाथाजी पाटील यांच्या हस्ते त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात आले.
यावेळी वीरेंद्रसिंहराजे घाटगे,नगरसेवक विजयेंद्र माने,हंबीरराव पाटील,संभाजी आरडे, यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.
शाहू उद्योग समूहाचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे म्हणाले,केंद्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी तर राज्यात मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपची दमदार वाटचाल सुरु आहे.मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात भाजपचे संघटन अधिक व्यापक व सर्वसमावेशक करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी जोमाने काम करावे.महेश पाटील यांच्यासारखा अभ्यासू व तळागाळातील कार्यकर्ता उपाध्यक्षपदी आल्याने पक्षाला नक्कीच बळ मिळेल.’सबका साथ, सबका विकास’ या मंत्राने सर्व जुन्या-नव्या कार्यकर्त्यांच्या साथीने जिल्ह्यात भाजप आणाखी मजबूत करण्यासाठी कार्यकर्त्यांच्या पाठीशी ठाम राहून त्यांना पाठबळ देऊ.
जिल्हा ग्रामीण (पूर्व) अध्यक्ष राजवर्धन नाईक-निंबाळकर म्हणाले, समरजितराजेंच्या भाजप प्रवेशामुळे जिल्ह्यात भाजपच्या कामगिरीचा आलेख आणखी उंचावेल.
यावेळी कोल्हापूर शहर महानगर अध्यक्ष विजय जाधव यांनीही मनोगत व्यक्त केले.




