कोल्हापूर शहरातील अपूर्ण असलेल्या एस.आय.आर वोटिंग मॅपिंगच्या कामाबाबत…

Spread the news

कोल्हापूर शहरातील अपूर्ण असलेल्या एस.आय.आर
वोटिंग मॅपिंगच्या कामाबाबत…

­

 

महोदय,
भारतीय संविधानाचे प्रतीक असलेल्या लोकशाहीला सुदृढ करणाऱ्या भारतीय निवडणूक आयोगाच्या निवडणूक पद्धतीमध्ये खऱ्या अर्थाने लोकशाहीचा विजय होण्यासाठी राबविण्यात येणाऱ्या मतदार पुनर्नरीक्षण कार्यक्रमांतर्गत प्रत्यक्ष मतदारांपर्यंत पोहोचून काम करणारी यंत्रणा अधिक सक्षम पणे काम करण्यासाठी त्यांना विहित मुदत देऊन प्रभावीपणे अचूक नियोजन आपल्याकडून होत नसल्याचे निदर्शनास येत असल्याने आज महाराष्ट्र नवनिर्माण सेना कोल्हापूर तर्फे प्राथमिक स्वरूपामध्ये आपणास निवेदन देत आहोत.
कोल्हापूर शहराची लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणात असल्यामुळे तेथील मतदारसंघ हे खूप मोठ्या प्रमाणावर विस्तारलेले आहेत. या मतदारसंघांमध्ये आपल्याकडून एस.आय. आर ची प्रक्रिया राबवली जात आहे.सदरहू प्रक्रिया राबवली जात असताना नेमणूक केलेल्या बी.एल.ओ.ना त्यांच्या मुख्यालयातील सज्जावरील कामाचा अतिरिक्त ताण व मुख्यालयातील असणारी उपस्थिती यामुळे मुख्य निवडणूक अधिकारी,महाराष्ट्र राज्य यांनी घालून दिलेल्या विहित मुदतीमध्ये सदर एस.आय.आर ची प्रक्रिया १० मे २०२६ पूर्ण होऊ शकत नाही.
कोल्हापूर शहरातील लोकसंख्येच्या तुलनेत मतदार यादी दुरुस्तीचे काम हे सरासरी लोकसंख्येपेक्षा ५०% ते ६०% मॅपिंगचे काम पूर्ण झाल्याचे दिसत आहे. उर्वरित ४०% मॅपिंगचे काम अपूर्ण आहे. ४०% मॅपिंग पूर्ण करण्यासाठी केवळ ४ दिवसाचा कालावधी राहिलेला आहे. राहिलेले विहित चार दिवसाच्या मुदतीमध्ये उर्वरित ४०% मॅपिंग हे पूर्ण होणे शक्य नाही. सदरहू ४०% मतदानाचे काम पूर्ण नाही झाले तर या चाळीस टाक्यांमधील समाविष्ट असणाऱ्या मतदारांना मतदानापासून वंचित रहावे लागेल. मतदानापासून वंचित राहणे म्हणजे हा लोकशाहीचा खून झाल्याचा प्रकार आहे.
सदरहू उर्वरित मॅपिंगचे काम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ मिळावी. एस .आय. आर ची प्रक्रिया राबवीत असताना बी.एल.ओ. यांच्याकडून चुकीच्या पद्धतीने सदरहू प्रक्रिया राबवली जात आहे. एकाच घरामध्ये दोन बी. एल. ओ. सर्वेसाठी जातात यामध्ये बी एल ओ.चा वेळ वाया जात आहे. यावरून कामांमध्ये अनियमितता दिसून येत आहे. मॅपिंग चे काम पूर्ण करत असताना काही मतदारांचे रहिवासी पुराव्या बाबत व स्थलांतराबाबत अडचणी निर्माण होत आहेत..
ज्या बेलोन ची नेमणूक करण्यात आली आहे त्या बीएलोंना एकाच घरामध्ये एकच बी. एल.ओ यांना पाठवून मॅपिंग चेक काम सु- व्यवस्थितपणे पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात यावेत. जे मतदार स्थलांतर झालेले आहेत त्याबाबतीत योग्य ते मार्गदर्शन देऊन त्या संदर्भी सूचना करण्यात याव्यात. ज्या बी एल ओं.ची एस.आय. आर .प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आलेली आहे त्या बी.एल.ओ ना आठवड्यातून दोन वेळेलाच त्यांच्या मूळ सज्जावर कार्यरत ठेवण्यात यावे व इतर तीन दिवस सदरहू एस.आय. आर. प्रक्रिया राबवण्याबाबत कार्यशील ठेवण्यात यावे.एस. आय.आर. प्रकिया राबवित असताना बी.एल.ओ.ना अध्ययावत केलेली मतदार यादी देण्यात यावी. प्रत्येकी एका बी एल ओ कडे सरासरी १२०० पेक्षा अधिक मतदारांचे मॅपिंग करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते परंतु उपनगरामध्ये ६०० ते ७०० इतक्या मतदारांचे मॅपिंग झालेले असून उर्वरित तीन दिवसात बाकीच्या मतदारांचे मॅपिंग होणे शक्य नाही. हा फक्त उपनगराचा प्रश्न आहे परंतु संपूर्ण कोल्हापूरचा विचार केला तर सदरहू आकडा फार मोठ्या प्रमाणावर दिसत आहे.उपरोक्त वरील एस.आय.आर वोटिंग मॅपिंग चे काम पूर्ण करण्यासाठी ९० दिवसाची मुदतवाढ मिळावी. जर एस आय आर प्रक्रियेमध्ये एकही मतदार शासनाच्या चुकीमुळे मतदानापासून वंचित राहिल्यास मनसे स्टाईलने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल.
जिल्हाध्यक्ष राजू दिंडोर्ले व शहर अध्यक्ष प्रसाद पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या आंदोलनात तालुका अध्यक्ष अभिजीत पाटील,जिल्हा सचिव निलेश आजगावकर,अरविंद कांबळे ,यतीन होरणे, विजय करजगार, शहर उपाध्यक्ष राजन हुल्लोळी, उत्तम वंदुरे, सुनिल तुपे, राहुल पाटील,,गणेश शिंदे, रोहीत कांबळे, गणेश सांगवडेकर, दिलीप पाटील, बाजीराव दिंडोर्ले, अजिंक्य शिंदे इत्यादी मनसे पदाधिकारी उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!