कोल्हापूर दक्षिण मधील 13 गावांसाठीची जलजीवन योजना जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याची मेघा कंपनीची लेखी ग्वाही

Spread the news

कोल्हापूर दक्षिण मधील 13 गावांसाठीची जलजीवन योजना जून 2027 पर्यंत पूर्ण करण्याची मेघा कंपनीची लेखी ग्वाही

­

 

कोल्हापूर दक्षिण मतदारसंघातील 13 गावांसाठी वरदान ठरणाऱ्या जलजीवन मिशन अंतर्गत गांधीनगर नळ पाणीपुरवठा योजना राजकारणासाठी जाणीवपुर्वक रखडत ठेवून पाण्यात सुद्धा राजकारण करणाऱ्या महायुती सरकार आणि मेघा इंजीनियरिंगच्या विरोधात महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या कोल्हापूर येथील कार्यालयावर आज माझ्या नेतृत्वात घागर मोर्चा नेण्यात आला. योजनेचे काम कधी पूर्ण होणार हे लेखी द्यावे यासाठी ठिय्या आंदोलन केले.

  •  

आमदार सतेज पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी आमदार असताना विशेष प्रयत्न करून ही योजना मंजूर करून आणली होती. या कामाचे क्रेडिट आम्हाला मिळू नये, यासाठी विद्यमान राज्य सरकार आणि हैदराबाद येथील मेघा इंजिनियरिंग अँड इन्फ्रास्ट्रक्चर ही कंपनी मुद्दामहून हे काम रखडवत आहेत. त्यामुळे यापुढे कामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी कंपनी तसेच प्रशासनातील अधिकाऱ्यांसोबत मी प्रत्येक महिन्याला आढावा बैठक घेणार असल्याचे याप्रसंगी बोलताना सांगितले. माझ्यासह महिला आणि ग्रामस्थांनी यावेळी योजनेच्या कामाबद्दल एमजेपी अधिकारी आणि मेघा कंपनी अधिकारी यांना धारेवर धरले. काम कधी पूर्ण होणे हे लेखी द्या त्यानंतरच आम्ही इथुन उठणार अशी भूमिका यावेळी घेतली. यावर जून 2027 पर्यंत योजना पूर्ण करण्याची ग्वाही मेघा कंपनीचे श्री. नितीन माने यांनी लेखी स्वरूपात दिली. यावेळी जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता दत्तात्रय पाटील, प्रभाकर गायकवाड, आर एन. मेस्त्री उपस्थित होते.

या मोर्चामध्ये जिल्हा परिषद सदस्य एकनाथ पाटील, सुदर्शन खोत, संग्राम पाटील, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष शशिकांत खोत, गोकुळचे माजी संचालक प्रकाश पाटील, बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील (चुयेकर), जिल्हा बँक संचालक स्मिता गवळी ,पंचायत समिती सदस्य संदीप पाटील, शिल्पा हजारे, अनिता कांबळे, संगीता यादव, सरपंच उत्तम आंबवडे, मधुकर चव्हाण, निशांत पाटील, चंद्रकांत डावरे, ए व्ही कांबळे, प्रियंका पाटील, रूपाली कुसाळे, सुमन गुरव, शुभांगी अडसूळ, अश्विनी शिरगावे, राधिका खडके, जहीदा इनामदार, शैलजा भोसले, प्रताब चंदवानी, बाबासो माळी, आशिष पाटील, युवराज गवळी, सुनील शिंदे, अमर मोरे, अरुण पाटील टोपकर, विनोद हुजूरानी, कीर्ती मसुटे, रावसाहेब पाटील, सचिन देशमुख, महेश जाधव, सुदर्शन पाटील, के. डी. माने, नायडू बागणे, दत्ता भिलुगडे, संग्राम पोवाळकर, संजय शिंदे, सतिश निर्मळ, ऋषिकेश हुन्नुरे आदींसह महिला, ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!