गोकुळवरील शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ तात्काळ बरखास्त करून त्यावर तज्ज्ञ अशासकीय व्यक्तींची नियुक्ती करावी

Spread the news

गोकुळवरील शासकीय अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ तात्काळ बरखास्त करून त्यावर तज्ज्ञ अशासकीय व्यक्तींची नियुक्ती करावी

­

 

माणिक पाटील (चुयेकर)

  •  

कोल्हापूर दि.१६ : गोकुळ दुध संघावर सद्या अस्तित्वात असलेले शासकीय

अधिकाऱ्यांचे प्रशासकीय मंडळ शासनाने त्वरित बरखास्त करून, त्यावर तज्ज्ञ अशासकीय व्यक्तींची नियुक्ती करावी, अशी मागणी गोकुळचे संस्थापक कै. आनंदराव पाटील (चुयेकर) यांचे बंधु व श्रीराम दुध संस्था, चुये चे संचालक माणिक पाटील (चुयेकर) यांनी एका प्रसिध्दी पत्रकाद्वारे केली आहे. गोकुळवर शासकीय प्रशासकीय मंडळ आलेपासून, दुध संकलनात ५०-६० हजार लिटरची घट झाली असल्याने ही एक धोक्याची घंटाच आहे, असे विधान गोकुळचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी नुकतेच केले होते. या अनुषंगानेच माणिक पाटील यांनी सद्याचे शासकीय प्रशासकीय मंडळ बरखास्तीची मागणी केली आहे.

दुध उत्पादकांशी सततचा संवाद साधणे, संघाच्यावतीने सुरू असणाऱ्या ३५ सेवा-सुविधा उत्पादकांपर्यंत पोहोचविणे, दुधाची गुणवत्ता राखणे, दुध दरातील चढ-उताराचे निरिक्षण करणे, दुध व उपप्रदार्थ निर्मिती यावरील बॅलन्स सांभाळणे, दुध उत्पादकांचे संलग्न संस्थांशी तसेच गोकुळशी बांधिलकी ठेवणे व मार्केटिंग या बाबी संघाच्या प्रगतीच्या दृष्टीने फारच महत्त्वाच्या राहतात. यासाठी राजकीय ताकद अत्यंत गरजेची असून, आजवर गोकुळच्या वाढीसाठी अनेक माजी चेअरमन तसेच अनेक सक्रीय संचालक आणि या क्षेत्रातील तज्ज्ञांनी मोठे योगदान दिले आहे. यामुळेच गोकुळचा आलेख नेहमीच चढता राहिला आहे. या सर्व गोष्टी शासकीय अधिकाऱ्यांकडून घडणे

अशक्य असल्यानेच त्याचा थेट परिणाम म्हणून गोकुळच्या दैनंदिन दुध संकलनात घट होणे सुरू झाले आहे.

यासाठीच शासनाने घटक पक्षांना विश्वासात घेवून, त्यावर सर्व सम्मतीचा प्रशासकीय अध्यक्ष नेमावा व प्रत्येक घटक पक्षातील एक-दोन तज्ज्ञांना घेवून नऊ अथवा अकरा जणांचे प्रशासकीय मंडळ गोकुळवर नेमावे, अशी मागणी माणिक पाटील (चुयेकर) यांनी केली आहे.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!