जयश्री जाधव यांच्या हस्ते राम गल्लीतील गटर्स कामाचा शुभारंभ उत्साहात संपन्न.

Spread the news

कोल्हापूर शहराच्या विकासाचा ध्यास घेत, मंगळवार पेठ येथील राम गल्लीतील गटर्स कामाचा शुभारंभ आज शिवसेनेच्या उपनेत्या व मा. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव यांच्या हस्ते उत्साहात संपन्न झाला. यावेळी नगरसेविका माधुरी नकाते व निलांबरी साळोखे यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

­

 

  •  

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या माध्यमातून, तसेच शिवसेना उपनेत्या व मा. आमदार जयश्री चंद्रकांत जाधव व कोल्हापूर महानगरपालिका परिवहन समितीचे सभापती सत्यजित चंद्रकांत जाधव यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांतून या विकासकामासाठी निधी मंजूर झाला असून, परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला अखेर न्याय मिळाला आहे.

“विकासाच्या प्रत्येक वाटेवर जनतेसोबत…” या भावनेतून सुरू झालेल्या या कामामुळे राम गल्ली परिसरातील गटार समस्येवर कायमस्वरूपी दिलासा मिळणार असून नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.

यावेळी किरण नकाते, गिरीश साळोखे, सचिन पाटील, श्रीकांत मंडलिक, क्रांती पाटील, निलेश गायकवाड, अवधूत घाटगे, विकास शिरगावे, किरण पाटील, रणजीत सासणे, अमित पवार, राहुल भुई, पप्पू सुर्वे, राजू भोई, राजू यादव, सुनिता सासणे, सीमा आडनाईक, मालती शिंदे, सुनीता मोरे, सुनीता वसर्गेकर, रंजना शिंदे यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!