पुणे शहरात सुरू असलेल्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन

Spread the news

पुणे शहरात सुरू असलेल्या ‘युवाशक्ती जागर यात्रा’ दरम्यान भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहराच्या वतीने युवा मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री मा. चंद्रकांतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडलेल्या या मेळाव्यात भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश अध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी उपस्थित राहून पदाधिकारी, कार्यकर्ते आणि युवकांना मार्गदर्शन केले.
यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा पुणे शहर औद्योगिक आघाडीच्या अध्यक्षपदी पुष्कर संभूस यांची तर सांस्कृतिक आघाडीच्या अध्यक्षपदी चेतन धोत्रे यांची नियुक्ती करण्यात आली.
पंतप्रधान मा. नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली देशात युवकांना मोठ्या प्रमाणावर संधी उपलब्ध होत असल्याचे सांगत, आत्मनिर्भर भारत, स्टार्टअप इंडिया, डिजिटल इंडिया यांसारख्या उपक्रमांमुळे युवकांना नवी दिशा मिळाल्याचे नमूद केले. संघटनात्मक पातळीवर प्रत्येक कार्यकर्त्याने जनतेपर्यंत पोहोचून समाजहिताची भूमिका मजबूत करावी, असे आवाहन कृष्णराज महाडिक यांनी केले.
‘युवा शक्ती एकत्र आली तर परिवर्तन अटळ आहे,’ असा विश्वास व्यक्त करत त्यांनी पुणे शहरातील युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांचे कौतुक केले आणि आगामी काळात अधिक जोमाने संघटन वाढवून भारतीय जनता पक्षाची विचारधारा घराघरात पोहोचविण्याचे आवाहन केले.
याप्रसंगी आमदार मा. सिद्धार्थ शिरोळेजी, पुणे भाजपा शहराध्यक्ष तथा नगरसेवक मा. धीरजजी घाटे, नगरसेवक मा. पुनीत जोशीजी, नगरसेवक मा. अमर आवळेजी, पुणे भारतीय जनता युवा मोर्चा अध्यक्ष मा. दुष्यांत भाऊ मोहळजी, सरचिटणीस मा. रोहन कोकाटेजी, युवा मोर्चा शिवाजीनगर दक्षिण मंडल अध्यक्ष मा. किरण ओरसेजी, युवा मोर्चा शिवाजीनगर उत्तर मंडल मा. शलाकाताई जेऊरजी, युवा मोर्चा शिवाजीनगर खडकी मंडल मा. योगेश कर्नुरजी, मा. अभिजित राऊतजी, मा. अनिरुद्ध कोकणेजी, मा. आशिष सुर्वेजी, मा. शिवम बालवडकरजी, मा. सागर शेटेजी, मा. समीर जोरीजी, मा. पंकज गित्तेजी यांच्यासह इतर मान्यवर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Spread the news

You may also like

error: Content is protected !!