प्राची माळी हीच्या मृत्यूनंतर अवयव दानाचा संकल्प पूर्ण

Spread the news

प्राची माळी हीच्या मृत्यूनंतर अवयव दानाचा संकल्प पूर्ण

­

 

कोल्हापूर:रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे जिल्हाध्यक्ष कृष्णात माळी रा‌. लाटवडे यांची द्वितीय कन्या व सोमनाथ उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक माळी यांची पुतनी कै.सौ प्राची दिग्विजय माळी वय वर्षे २४ हिचे दि.२४ रोजी अल्पशा आजाराने कोल्हापूर येथील हायटेक हॉस्पिटल मध्ये उपचार घेत असताना आकस्मिक दुःखद निधन झाले तिच्या अचानक झालेल्या निधनाने लाटवडे व पेठ या गावावरती शोककळा पसरली सर्व क्षेत्रामध्ये तिच्या अचानक झालेल्या निधनाने हळहळ व्यक्त होत आहे.
जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेने तिने जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान नाणिजधाम महाराष्ट्र यांच्या कडे मरणोत्तर देहदान करण्याचा संकल्प करून फॉर्म भरला.
होता याच अनुषंगाने मृत्यू नंतर माझेही मरणोत्तर देहदान व्हावे ही अपेक्षा तिने व्यक्त केली होती.
तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा या जगद्गुरुश्रींच्या शिकवणी नुसार तिने नेत्रदान 👀 करण्याचा निर्णय तिचे वडील कृष्णात माळी चुलते अशोक माळी पती दिग्विजय माळी व भाऊ गुरुप्रसाद माळी शुभम माळी
व संपूर्ण कुटुंबाने नातेवाईकांनी निर्णय घेऊन सर्वांनी तिची नेत्रदान करण्याची इच्छा पूर्ण करण्याचा निर्णय घेतला तिचे नेत्रदान
ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूर येथील डॉक्टरांनी करून घेतले ,तिच्या या कृतीने ती अजरामर झाली आहे. व आपल्या या नेत्रदानाने दुसऱ्या एका व्यक्तीला जगण्यासाठी दृष्टी देऊन गेली. तिच्या या निर्णयामुळे मरणोत्तर देहदान व अवयव दान चळवळ समाजामध्ये मोठ्या प्रमाणात होईल जगद्गुरु रामानंदाचार्य श्रीमद नरेंद्राचार्य यांच्या प्रेरणेतून तिचे 159 वे अवयव दान झाले आहे.
यावेळी रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे सर्व पदाधिकारी गुरुबंधू गुरु भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  •  

Spread the news

You may also like

error: Content is protected !!