Spread the news

गोखले कॉलेजमध्ये पी.एस.एन. सप्लाय चेन सोल्युशन बेंगलोर कॅम्पस इंटरव्हयूमध्ये 27 विद्यार्थीनींची अभिनंदनीय निवड

­

 

  •  

कोल्हापूर – दि.24 श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन, गोपाळ कृष्ण गोखले कॉलेज व पी. एस.एन. सप्लाय चेन सोल्युशन प्रा. लि. बेंगालोर या कंपनीच्या वतीने संयुक्तरित्या टेक्नीकल असिस्टंट पदाकरिता (बेसिक आयफोन मॅन्युफूक्चरिंग कंपनी) तर्फे कॅम्पस इंटरव्हयू’ संपन्न झाला.

या निवड प्रक्रियेमध्ये 200 विद्यार्थीनींनी सहभाग नोंदवला त्यापैकी 27 विद्यार्थीनींची अभिनंदनीय निवड झाली. त्यांना वार्षिक पॅकेज 2,19000/- (रु. दोन लाख एकोणतीस हजार) दिले जाणार असून निवड झालेल्या विद्यार्थीनींचे प्राचार्य आर. बी भुयेकर यांनी अभिनंदन केले. यावेळी कंपनीचे अधिकारी श्री. नंदकिशोर बोगे व सौ. ऋतुजा पृथ्वी मोरे, सचिव श्रीमती सुशिलादेवी मल्हारराव देसाई युवती सचेतना फौंडेशन, यांनी संयोजन केले.

या कार्यक्रमास शिक्षण प्रसारक मंडळाचे सेक्रेटरी प्रा. जयकुमार देसाई, चेअरमन प्रा.डॉ. मंजिरी अजित मोरे, पेट्रन कॉन्सिल मेंबर दौलत देसाई, प्रशासन अधिकारी पृथ्वी मोरे यांचे विशेष मार्गदर्शन व सहकार्य लाभले.

यावेळी प्राचार्य डॉ. आर. बी. भुयेकर, माजी उपप्राचार्य एन. टी. पाटील, उपप्राचार्या, सौ, रश्मी यादव, पर्यवेक्षक एम. एल. धनवडे, कॅम्पस इंटरव्हयू सेल प्रमुख प्रा. एस. आर. घाटगे, प्रा. पी. बी. झावरे, प्रा. सौ. एस. एस. नागरन्नावर, प्रा.सौ.एस. आर. गडदे तसेच सर्व प्राध्यापक, प्रशासकीय कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!