शिष्यवृत्ती सराव परिक्षा राजे फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम-जि.प.अध्यक्षा शिल्पा खोत
एकाचवेळी३६केंद्रावर १०२३० विद्यार्थ्यांचा सहभाग
सेनापती कापशी,प्रतिनिधी.
शिष्यवृत्ती सराव परिक्षा हा राजे फौंडेशनचा स्तुत्य उपक्रम आहे.असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिल्पा खोत यांनी केले.
येथील न्यायमुर्ती रानडे विद्यालयात शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेल्या शिष्यवृत्ती सराव परीक्षेच्या उदघाटनवेळी त्या बोलत होत्या.अध्यक्षस्थानी राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे होत्या.
कागल,करवीर,गडहिंग्लज व आजरा या चार तालुक्यातील छत्तीस केंद्रावर १०२३०विद्यार्थ्यांनी एकाच वेळी ही परीक्षा दिली.राजे फाउंडेशन व राजमाता जिजाऊ महिला समितीच्या माध्यमातून सलग पंचविसाव्या वर्षी ही परिक्षा झाली.आज अखेर सव्वा लाखाहून अधिक विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली असल्याची माहिती संयोजकांनी दिली.
अध्यक्षा खोत पुढे म्हणाल्या,राजे समरजितसिंह घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फौंडेशनकडून तर मंत्री हसन मुश्रीफ यांच्या मार्गदर्शनाखाली मुश्रीफ फौंडेशनकडून राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांमुळे कागल तालुक्याचा शैक्षणिक दर्जा उंचावला आहे.
अध्यक्षिय मनोगतात सौ.नवोदिता घाटगे म्हणाल्या,शिष्यवृत्ती सराव परिक्षेचा विद्यार्थ्यांना फायदा होत आहे.अनेक विद्यार्थी शिष्यवृत्तीधारक बनले आहेत.
अपुऱ्या सुविधा असतानाही मेहनती शिक्षकांच्यामुळे कागल तालुका शैक्षणिकदृष्ट्या जिल्ह्यात प्रथम क्रमांकावर आहे.
कार्यक्रमास ‘शाहू’चे संचालक सचिन मगदूम,गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे,प्रकाश पाटील,कापशीच्या सरपंच उज्वला कांबळे,पंचायत समिती सदस्या सुनिता माळी, मुख्याध्यापक माने, जगदीश मोरे, तानाजी पाटील, आरएसएसचे प्रमुख मिलिंद देशपांडे, रमेश कदम सरपंच सुरेखा लुगडे,जगदीश मोरे,तानाजी पाटील ,कर्नल(नि)शिवाजीराव बाबर, प्रवीण नाईकवाडे,प्रकाश पाटील,एम व्ही कुलकर्णी,दिलीप तिप्पे,रमेश कांबळे आदी उपस्थित होते.
‘शाहू’चे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे यांनी स्वागत केले. तुकाराम भारमल यांनी आभार मानले.
छायाचित्र-सेनापती कापशी ता कागल येथे शिष्यवृत्ती सराव परीक्षा प्रश्नपत्रिका वाटपवेळी राजे बँकेच्या अध्यक्षा सौ. नवोदिता घाटगे,जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. शिल्पा खोत, शाहूचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे,गटशिक्षणाधिकारी सौ. सारिका कासोटे व इतर.




