वाढीव टप्पा अनुदानासाठी करणार आंदोलन
खंडेराव जगदाळे यांचा इशारा
कोल्हापूर
20 टक्के,40 टक्के 60 टक्के,80टक्के अनुदान घेत असलेल्या प्राथ. माध्य व उच्च माध्य शाळां व वर्ग तुकड्यांना यापुढील वाढीव टप्पा अनुदान संच मान्यतेनुसार 1 जून 2026 पासून मिळणेबाबत व त्रुटी पुर्तता केलेल्या शाळांना समान टप्पा देण्याबाबत तथा प्रचलित धोरणानुसार पुढील टप्पे देय देण्यात यावेत याबाबत 22 जून 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करीत असले बाबत
उपरोक्त विषयान्वये, 20 टक्के,40 टक्के 60 टक्के,80टक्के अनुदान घेत असलेल्या प्राथ. माध्य व उच्च माध्य शाळां व वर्ग तुकड्यांना यापुढील वाढीव टप्पे संच मान्यतेनुसार 1 जून 2026 पासून मिळणेबाबत तसेच १२ व १५ व २४ फेब्रुवारी २०२१ नुसार प्राथ व माध्य व उच्च माध्य त्रुटी पुर्तता केलेल्या शाळा व तुकड्या यांना दिनांक १४ ऑक्टोंबर २०२४ च्या शासन आदेशानुसार मानीव वैकल्पीत टप्पा देण्यात आला होता. परंतु दिनांक २५/८/२०२५ रोजीच्या शासन आदेशामध्ये अशा शाळा परत रद्द करण्यात आल्या. सदर शाळांना शुध्दीपत्रक किंवा शासन आदेश काढून तो समान टप्पा देण्यात यावा, प्रलंबित टप्पा वाढ आदेश त्वरीत देण्यात यावे.
प्रमुख मागण्या खालील प्रमाणे :-
१. 20 टक्के,40 टक्के 60 टक्के,80टक्के अनुदान घेत असलेल्या प्राथ. माध्य व उच्च माध्य शाळां व वर्ग तुकड्यांना सरसकट शब्द वगळून यापुढील वाढीव टप्पे संच मान्यतेनुसार 1 जून 2026 पासून मिळणेबाबत
2. त्रुटी पूर्तता केलेल्या शाळांना 25 ऑगस्ट 2025 च्या शासन निर्णयानुसार समान टप्प्यावर अनुदान देण्याबाबत आदेश होणेबाबत.3. 2022-23 मध्ये शेवटच्या वर्गाची कमी पटसंख्येमुळे अपात्र करण्यात आलेल्या शाळांना संचमान्यता 2023-24 किंवा 2024-25 ची संचमान्यते मधील पदे ग्राह्य धरण्यात येऊन अनुदान देण्यात यावे.तसे शुद्धीपत्रक काढावे
३. पुणे स्तरावर अघोषित असणाऱ्या शाळा व वर्ग तुकड्या अनुदानासह घोषित करण्यात याव्यात.
५. सर्व अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेत्तर यांना ठोस पेन्शन योजना लागू करण्यात यावी.
६. अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांना वैद्यकीय प्रतिपुर्ती योजना लागू करण्यात यावी.
७. अंशतः अनुदानित शाळेतील शिक्षकांची वयोमर्यादा 58 वरून 60 वर्षे करण्याबाबत.
तरी आपणास नम्र विनंती की, आपण आमच्या मागण्याचा विचार करून आम्हाला योग्य न्याय देण्याची कृपा करावी ही विनंती.
अन्यथा दि 22 जून 2026 पासून आझाद मैदान मुंबई या ठिकाणी धरणे आंदोलन सुरू करीत आहोत याची नोंद घ्यावी
खंडेराव जगदाळे
समन्वयक





