Spread the news

नशामुक्त महाराष्ट्र अभियान यशस्वी करण्यासाठी भाजप युवा मोर्चा सक्रीय योगदान देईल, भाजप युवा मोर्चाचे प्रदेेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांची ग्वाही

­

 

 

  •  

महाराष्ट्रात विविध ठिकाणी रेव्ह पार्टीच्या माध्यमातून अंमली पदार्थ सहज उपलब्ध होत आहेत. अंमली पदार्थांची नशा तरूणाईसाठी निश्चितच घातक आहे. देशाचे भवितव्य घडवणार्या तरूणाईला नशिल्या व्यसनापासून दूर ठेवण्यासाठी राज्यभरात प्रचार आणि प्रसार करून, नशा मुक्तीसाठी प्रयत्न केले जातील. त्यातून नशामुक्त महाराष्ट्र हे अभियान यशस्वी करण्यासाठी युवा मोर्चा सक्रीय राहील, अशी ग्वाही भाजप युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक यांनी दिली.

तरूणाईसाठी आदर्शवत काम करणार्या कृष्णराज महाडिक यांच्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच भाजपच्या वरिष्ठ व्यवस्थापनाने विश्वास दाखवला. त्यामुळेच अत्यंत कमी वयात कृष्णराज महाडिक यांच्यावर भाजपा युवा मोर्चाच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी येवून पडली. हा विश्वास सार्थ ठरवण्यासाठी कृष्णराज महाडिक यांनी, राज्यभरात दौरा करून, तरूणाईची मते जाणून घेतली. या दरम्यान त्यांना इतर प्रश्नांसोबतच अनेक तरूणतरूणी नशेच्या आहारी गेल्याचे दिसून आले. त्यातूनच त्यांनी युवा मोर्चाच्या राज्यभरातील पदाधिकार्यांशी संवाद साधून, नशामुक्त महाराष्ट्र या चळवळीला सुरवात करण्याचे सुतोवाच केले होते. त्याची प्रत्यक्ष सुरवात करवीर नगरीतून झाली. कृष्णराज महाडिक यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून, शुक्रवारी कोल्हापुरातील मिरजकर तिकटी इथल्या दूध कट्टयावर दूध वाटपाचा कार्यक्रम पार पडला. या उपक्रमाला युवा वर्गातून उत्स्फुर्त प्रतिसाद लाभला. यापुढे हा उपक्रम राज्यातील विविध गावे आणि शहरांमध्ये राबवला जाणार असल्याचे कृष्णराज महाडिक यांनी सांगितले.   मिरजकर तिकटी इथं भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकार्यांसमवेत कृष्णराज महाडिक यांच्या हस्ते दूध वाटप करण्यात आले. भाजपकडून राबवला जाणारा नशामुक्त महाराष्ट्र उपक्रम कौतुकास्पद आणि दिशादर्शक असल्याचे महाडिक यांनी सांगितलेआपल्या वाढदिवसानिमित्त या उपक्रमाचे चळवळीत रूपांतर होईल, असा विश्वास कृष्णराज महाडिक यांनी व्यक्त केला. यावेळी भाजपचे पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते.


Spread the news

You may also like

error: Content is protected !!