कलासक्त परिवाराच्या वतीने द लिजंड स्वर्गीय राज कपूर यांचा स्मृतिदिन साजरा स्मारक सुशो भीकरणाची मागणी
द लिजेंड स्वर्गीय राजकपूर यांच्या 38 व्या स्मृतिदिनानिमित्त राज कपूर स्मारक जुना वाशी नाका येथे कलासक्त परिवाराच्या वतीने उपमहापौर अक्षय जरग यांच्या हस्ते नगरसेवक प्रसाद चव्हाण शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख किशोर घाटगे, प्रतीक पाटील कलासक्त परिवाराचे दिनकर साळुंखे,नीलिमा काळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पुष्पहार अर्पण करण्यात आला त्यावेळी कलासक्त चे दिनकर साळुंखे यांनी कलासक्त परिवाराच्या वतीने लवकरच स्वर्गीय राज कपूर यांच्या गाण्यावर आधारित 100 गाण्याचा वर्ल्ड रेकॉर्डचा कार्यक्रमा आयोजित केला असून यामध्ये मोठ्या संख्येने सहभाग नोंदवावा असे आवाहन केले सामाजिक कार्यकर्ते किशोर घाटगे यांनी संभाजी पाटील यांनी देशातला एकमेव स्वर्गीय राज कपूर यांचा पुतळा कोल्हापूर या ठिकाणी उभा केला असून त्याचे उद्घाटन कपूर कुटुंबातील शशी कपूर यांनी केले असून गेल्या अनेक वर्ष त्यांचा स्मृतिदिन व जयंतीच्या माध्यमातून कलासक्त परिवार आठवण जपत आहे. सदर स्मारकाची दुरावस्था झाली असून या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे तसेच विविध महापुरुषांचे जसे जयंती व पुण्यतिथी महापालिकेच्या वतीने साजरी करण्यात येते त्यामध्ये स्वर्गीय राज कपूर यांचा समावेश करावा अशी मागणी केली. उपमहापौर अक्षय जरग यांनी सुशोभीकरणाच्या प्रस्तावावर सहानभूतीपूर्वक विचार करण्याचे आश्वासन दिले यावेळी लालासाहेब गायकवाड, डॉक्टर देवेंद्र रासकर, मोहन लोंढे अमृता गलांडे सुचित्रा खटावकर राहुल मुचेंडेकर,महेश भंडारी, रवींद्र मिस्त्री,भगवान गायकवाड,युवराज जाधव, शिवराज सावंत,अनिल पाटील, सागर ठाणेकर, राजेंद्र मकोटे आदि उपस्थित होते





